Ramadan Eid : कर्जत शहरात रमजान ईद उत्साहात

Ramadan Eid : कर्जत शहरात रमजान ईद उत्साहात

0
Ramadan Eid : कर्जत शहरात रमजान ईद उत्साहात
Ramadan Eid : कर्जत शहरात रमजान ईद उत्साहात

Ramadan Eid : कर्जत : कर्जत शहरात रमजान ईद (Ramadan Eid) (ईद-उल-फित्र) मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शनिवारी सकाळी ९ वाजता मौलाना तय्यब पठाण (Maulana Tayyab Pathan) यांच्या मार्गदर्शनाखाली सामूहिक ईदची नमाज ईदगाह मैदान (Eidgah Ground) येथे झाली. यावेळी सर्व पक्षीय आणि सामाजिक संघटनांनी मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या.

नक्की वाचा : ढवळपुरी परिसराला गारपिटीचा तडाखा; काढणीला आलेली पिके मातीमोल, शेतकरी हवालदिल

सामुदायिक रमजान ईदची नमाज पठन

कर्जत शहर आणि तालुक्यात विविध ठिकाणी रमजान ईद उत्साहात साजरी करण्यात आली. मागील एक महिन्यापासून मुस्लिम बांधवांनी निरंक रोजा आणि तरावीहची नमाज झाली. शुक्रवारी संध्याकाळी ईदचा चंद्रदर्शन झाल्यानंतर रोजा आणि तरावीहची सांगता होत शनिवारी रमजान ईद करण्याचे मौलवीनी जाहीर केले. कर्जत शहरात शनिवारी सकाळी ९ वाजता ईदगाह मैदानात समस्त मुस्लिम बांधवांनी सामुदायिक रमजान ईदची नमाज पठन केली. आलमगीर मशिदीचे मौलाना तय्यब पठाण यांनी रमजान ईदची नमाज आणि खुदबा झाला.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

यांची उपस्थिती (Ramadan Eid)

यावेळी पोलीस निरीक्षक सोपान शिरसाट, भाजपाचे सचिन घुले, अनिल गदादे, जिल्हा बँकेचे संचालक अंबादास पिसाळ, बाळासाहेब साळुंके, प्रथम नगराध्यक्ष नामदेव राऊत, सुनील शेलार, संत सदगुरु गोदड महाराज अन्नछत्र मंडळाचे प्रा शशिकांत पाटील, काकासाहेब धांडे, सरकारी वकील ॲड उत्तम नेवसे, दादासाहेब सोनमाळी, सर्व सामाजिक संघटनेचे राहुल नवले, प्रा विशाल मेहेत्रे, जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष गणेश जेवरे, नगरसेवक सतीश पाटील, ॲड संजीवन गायकवाड, माजी नगरसेवक संदीप बरबडे यांनी उपस्थित राहत मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या.

यासह विधान परिषदेचे सभापती प्रा राम शिंदे, आमदार रोहित पवार, खासदार निलेश लंके, अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावतीने पदाधिकाऱ्यांनी शुभेच्छा दिल्या. आमदार रोहित पवार यांच्यावतीने कर्जत ईदगाह मैदान येथे गुलाबपुष्प देत मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या.