Ramdas Athwale:‘एकनाथ शिंदेंनी दोन पावलं मागे येण्याची गरज’,रामदास आठवलेंचा अजब सल्ला

0
Ramdas Athwale:‘एकनाथ शिंदेंनी दोन पावलं मागे येण्याची गरज',रामदास आठवलेंचा अजब सल्ला
Ramdas Athwale:‘एकनाथ शिंदेंनी दोन पावलं मागे येण्याची गरज',रामदास आठवलेंचा अजब सल्ला

Ramdas Athvale: एकनाथ शिंदेंना (Eknath Shinde) दोन पावले मागे येण्याची गरज असल्याचे विधान केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athvale) यांनी केलं आहे. दिल्लीत संसदेच्या आवारात माध्यमांशी बोलताना रामदास आठवले यांनी हे विधान केले आहे.

विधानसभा निवडणुकीत राज्यात महायुतीला बहुमत मिळाले आहे. भाजप १३२, शिवसेना (शिंदे) ५७ आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) ४१ अशा २३५ जागा महायुतीला मिळाल्या आहेत. मात्र मुख्यमंत्री कोण होणार? यावरून महायुतीमध्ये वाद सुरू आहे. एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्रीपदावर असावेत, यासाठी शिवसेनेकडून दबाव टाकला जात आहे. तर शिंदेंची मनधरणी करण्याचे प्रयत्न केंद्रातून केले जात आहेत. यादरम्यान केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचे महत्त्वाचे विधान समोर आले आहे. त्यांनी एकनाथ शिंदेंना केंद्रात मंत्री होण्याचा सल्ला दिला आहे.

नक्की वाचा :  भाजप बहुमतासाठी शिंदे,अजित पवारांचा पक्ष देखील फोडेल’ – संजय राऊत

रामदास आठवले काय म्हणाले? (Ramdas Athwale)

मंत्री रामदास आठवले म्हणाले की, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चांगले काम केले होते. त्यांचे ५७ आमदार निवडून आले आहेत. हा आकडा खूपच चांगला आहे. पण भाजपचे १३२ आमदार निवडून आलेले आहेत. त्यामुळे भाजप पक्षाने मुख्यमंत्रीपदावर दावा केला आहे. तसेच भाजप पक्षश्रेष्ठींनी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री बनविण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र एकनाथ शिंदे नाराज दिसत आहेत. त्यांची नाराजी दूर करण्याची गरज आहे.”

अवश्य वाचा : ‘खाशाबा’चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना समन्स

महायुतीच्या विजयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा महत्त्वाचा वाटा होता. लाडकी बहीण योजना यशस्वी ठरली. त्याबद्दल त्यांचे अभिनंदनच केले पाहीजे. मात्र भाजपकडे प्रचंड जागा आहेत. त्यामुळे ते काही ऐकणार नाही. ज्याप्रमाणे २०२२ साली देवेंद्र फडणवीस चार पावले मागे आले होते. त्याप्रमाणे आता शिंदे यांनी दोन पावले मागे येण्याची आवश्यकता आहे,असेही रामदास आठवले म्हणाले आहेत.

‘एकनाथ शिंदेंनी केंद्रात मंत्री व्हावे’ (Ramdas Athwale)

आठवले पुढे बोलताना म्हणाले की, “एकनाथ शिंदे यांनी एकतर उपमुख्यमंत्रीपद घ्यावे किंवा त्यांना उपमुख्यमंत्री व्हायचे नसेल तर त्यांनी केंद्रात येऊन मंत्रीपद घ्यावे. पंतप्रधान मोदी आणि अमित शाह नक्कीच त्यांचा विचार करतील. पण त्यांनी नाराजी दूर करून लवकरात लवकर निर्णय घेतला पाहीजे”,असेही रामदास आठवले म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here