Ramdas Athawale : संविधान बदलण्याची कोणाचीही हिंमत नाही: मंत्री रामदास आठवले

Ramdas Athawale : संविधान बदलण्याची कोणाचीही हिंमत नाही: मंत्री रामदास आठवले

0
Ramdas Athawale

Ramdas Athawale : संगमनेर : संविधान (Constitution) बदल्याचे कितीही आरोप झाले, तरी आम्ही असेपर्यंत संविधान बदलण्याची कोणाचीही हिंमत नाही. विरोधक हे संविधान बदलणार असा अप्रचार करुन लक्ष विचलीत करत आहेत. मात्र २०२४ ला नरेंद्र मोदीचं (Narendra Modi) पुन्हा पंतप्रधान होणार अन् हा पठ्ठ्या पुन्हा मंत्री होणार असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी केले.

हे देखील वाचा: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते झाले देशातील पहिल्या अंडरवॉटर मेट्रोचं उद्घाटन

सामाजिक सलोखा परिषद व संविधान सन्मान सोहळा (Ramdas Athawale)

संगमनेर येथील बस स्थानकासमोरील मैदानात घेण्यात आलेल्या सामाजिक सलोखा परिषद व संविधान सन्मान सोहळ्याप्रसंगी आठवले बोलत होते. याप्रसंगी माजी मंत्री अविनाश महातेकर, रिपाई प्रदेश उपाध्यक्ष विजयराव वाकचौरे, राज्य उपाध्यक्ष तथा जिल्हा संपर्क प्रमुख श्रीकांत भालेराव, जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात, बाळासाहेब गायकवाड, सुनिल मोरे, दिपकराव गायकवाड, प्रकाश लोढे, रिपाई युवा जिल्हाध्यक्ष पप्पू बनसोडे, सुनिल साळवे, रिपाई तालुकाध्यक्ष आशिष शेळके आदी उपस्थित होते.

नक्की वाचा: मराठ्यांनी पीएम मोदींविरोधातच थाेपटले दंड; वाराणसीतून एक हजार उमेदवारी अर्ज दाखल करणार

यावेळी आठवले म्हणाले (Ramdas Athawale)


संगमनेर शहर हे ऐतिहासिक शहर असून मला येण्यास उशिर झाला असताना सुद्धा संगमनेरकरांनी मोठ्या उत्साहात माझे स्वागत केले. या प्रेमापोटी मी भारावून गेलो. उदया मी जर शिर्डीतून उमेदवारी केली नाही तरी मी सदैव तुमच्या पाठीशी उभा राहिल. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांशी एकनिष्ठ राहून रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून “सामाजिक सलोखा ” कायम ठेवण्याचे मुख्य कार्य आमचे आहे. आठवले पुढे म्हणाले की, नरेंद्र मोदीच्या नेतृत्वाखाली संपूर्ण देशात सबका साथ सबका विकास धर्तीवर लोकांकरिता कल्याणकारी योजना राबविल्या जात आहेत. मराठा समाज्याला आरक्षण मिळावे, या मताचा मी असून इतरांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजालाही आरक्षण मिळाले पाहिजेल, असे आठवले म्हणाले. प्रास्ताविक श्रीकांत भालेराव,आशिष शेळके यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here