
Ramdas Maharaj Shastri : पाथर्डी : स्नेहसंमेलन ही विद्यार्थ्यांसाठी केवळ एक सांस्कृतिक (Cultural) मेजवानी नसून त्यांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळवून देणारी सुवर्णसंधी आहे. अशा कार्यक्रमांतूनच उद्याचे नाटककार, गायक, कलाकार आणि नेतृत्व घडत असते. अभ्यासाच्या ताणातून विद्यार्थ्यांना (Students) दिलासा देत त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला चालना देण्यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे, असे प्रतिपादन रामदास महाराज शास्त्री (Ramdas Maharaj Shastri) यांनी केले.
नक्की वाचा : वाघुंडे बुद्रुकच्या लेकीची ‘भरारी’; मोहिनी रासकर नगररचना विभागाच्या परीक्षेत मुलींमध्ये राज्यात प्रथम
हा उपक्रम विशेष कौतुकास्पद
पाथर्डी तालुक्यातील नांदूर निंबादैत्य येथील समाजसेवक आजिनाथ दहिफळे यांनी ग्रामीण भागातील गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेल्या संत भगवान बाबा रात्रशाळेच्या वतीने आयोजित स्नेहसंमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. ग्रामीण विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत सांस्कृतिक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा हा उपक्रम विशेष कौतुकास्पद ठरला. या स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी धार्मिक, सांस्कृतिक तसेच देशभक्तीपर गीत, नृत्य आणि विविध कलाप्रकार सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
अवश्य वाचा : ‘घबाडकुंड’ चित्रपट ठरणार मराठीतला पहिला युनिव्हर्स
रामदास महाराज शास्त्री म्हणाले की (Ramdas Maharaj Shastri)
पारंपरिक लोककला आणि उत्साही नृत्य सादरीकरणांमुळे संपूर्ण वातावरण रंगून गेले. विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासपूर्ण सादरीकरणाने पालक, ग्रामस्थ आणि उपस्थित मान्यवर भारावून गेले. ग्रामीण संस्कृतीची झलक आणि विद्यार्थ्यांच्या प्रतिभेची झेप या कार्यक्रमातून प्रकर्षाने दिसून आली.रामदास महाराज शास्त्री म्हणाले की, विद्यार्थ्यांनी केवळ पुस्तकी ज्ञानावर समाधान न मानता विषयाबाहेरील ज्ञानही आत्मसात करणे आवश्यक आहे. बदलत्या काळात केवळ शासकीय नोकरीवर अवलंबून न राहता आधुनिक तंत्रज्ञानाधारित शेती, विशेषतः इस्रायली शेती पद्धती आणि लघुउद्योगांकडे वळण्याची गरज आहे.
📣 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
🪀 https://chat.whatsapp.com/D9yG5gFstDCESNfitc3gt9
कॉलेज जीवनात कोणी सक्ती करत नाही
अपयश आले म्हणून खचून जाऊ नका आणि यश मिळाले म्हणून हुरळूनही जाऊ नका. कॉलेज जीवनात कोणी सक्ती करत नाही, त्यामुळे प्रत्येकाने स्वतःचे ध्येय निश्चित करून स्वतःचे भविष्य घडविण्याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले. एकनाथ पालवे यांनी सूत्रसंचालन तर संत भगवान बाबा रात्रशाळेचे संचालक आजिनाथ दहिफळे यांनी आभार मानले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून समाजसेवक नवनाथ खेडकर उपस्थित होते. तसेच सुजित चौधर, समाधान वाबळे, गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, श्री निंबादैत्य सार्वजनिक ट्रस्टचे पदाधिकारी, माजी विद्यार्थी तसेच पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


