Ramgiri Maharaj : श्रीगोंदा : सनातन संस्कृती (Sanatan Culture) हीच भारताची खरी ओळख आहे. आजवर अनेक परकीय आक्रमणे झाली, तरीही ही संस्कृती टिकून आहे. मात्र, हिंदू (Hindu) समाज असंघटित राहिल्याचा फायदा आक्रमकांनी घेतला. त्यामुळे आता हिंदू समाजात शत्रूबोध, इतिहासबोध आणि स्वयंबोध असणे काळाची गरज आहे,” असे प्रतिपादन सरला बेटचे रामगिरी महाराज (Ramgiri Maharaj) यांनी केले.
नक्की वाचा : राजळे कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थिनींचे यश; राष्ट्रीय स्तरावरील पोस्टर स्पर्धेत पटकविला द्वितीय क्रमांक
वक्फ बोर्डावर जोरदार टीका
श्रीगोंदा शहरात आयोजित ‘विराट हिंदू संमेलनात’ मुख्य मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर भूषण महाराज महापुरुष, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विभाग बौद्धिक प्रमुख कृष्णाजी घरोटे, माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. सोमनाथ मंदिरावर झालेली १७ आक्रमणे आणि औरंगजेबाने केलेला आपल्याच भावाचा वध, या घटनांचा दाखला देत महाराजांनी सांगितले की, जर आपण इतिहासातून शिकलो नाही, तर इतिहासाची पुनरावृत्ती झाल्याशिवाय राहणार नाही. वक्फ बोर्डावर जोरदार टीका करत वक्फ बोर्ड हे भूमाफिया प्रमाणे वागत आहे. हिंदू मंदिरांच्या जमिनी बळकावत असल्याचा आरोप महाराजांनी केला.
अवश्य वाचा : राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये जिल्ह्याचा राज्यात चौथा क्रमांक
वारकरी संप्रदायात सर्व जातींचे संत (Ramgiri Maharaj)
मढी येथील कानिफनाथ देवस्थानच्या जमिनीवर वक्फ बोर्डाने सांगितलेला दावा हे त्याचेच उदाहरण असल्याचे त्यांनी नमूद केले. संतांनी जातीभेदाच्या पलीकडे जाऊन समाज जोडण्याचे काम केले. वारकरी संप्रदायात सर्व जातींचे संत होते. संत शेख महंमद महाराज हे मुस्लिम असूनही पांडुरंगाचे निस्सीम भक्त होते, हा वारकरी संस्कृतीचा वारसा असल्याचे त्यांनी सांगितले. हिंदू धर्मातील अनिष्ट प्रथा बंद करण्यासाठी अनेक समाजसुधारक पुढे आले. त्याच धर्तीवर इतर धर्मांतील चांगल्या विचारांच्या लोकांनीही पुढाकार घेऊन आपापल्या धर्मातील वाईट गोष्टी दूर केल्या पाहिजेत असे सांगितले.
अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
🪀 https://chat.whatsapp.com/D9yG5gFstDCESNfitc3gt9
समाजात परिवर्तन घडवण्यासाठी संघटित शक्तीची आवश्यकता
समाजात परिवर्तन घडवण्यासाठी संघटित शक्तीची आवश्यकता आहे. जेव्हा समाज रोज एकत्र येतो, तेव्हाच तो सुसंघटित होतो. संघ ही केवळ संघटना नसून ते एक जीवनमान असल्याचे आर.एस.एस.चे कृष्णाजी घरोटे यांनी बोलताना सांगितले. डॉ. रवींद्र जंजिरे यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले, तर सुनील अनभुले यांनी आभार मानले. श्रीपाद कुलकर्णी व आदित्य अनवणे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. या संमेलनाला नगराध्यक्षा सुनीता खेतमाळीस, उपनगराध्यक्षा अलका अनभुले, महिला बाल कल्याण सभापती मीरा शिंदे, अनिल रामदासी यांच्यासह सर्व नगरसेवक, मोठ्या संख्येने वारकरी, भाविक आणि हिंदुत्ववादी कार्यकर्ते उपस्थित होते.



