Mahant Ramgiri Maharaj : सराला बेटाचे मठाधिपती महंत रामगिरी महाराज (Ramgiri Maharaj) हे नेहमीच आपल्या वादग्रस्त विधानामुळे चर्चेत असतात.आता पुन्हा त्यांनी मोठं वादग्रस्त विधान (Controversial statement) केले आहे. रवींद्रनाथ टागोर लिखित जन-गण-मन हे आपले राष्ट्रगीत (National Anthem) नसून वंदे मातरम राष्ट्रगीत व्हावे,असे ते म्हणाले. याप्रसंगी त्यांनी रवींद्रनाथ टागोर यांनी हे गीत का लिहिले, त्यांना नोबेल पारितोषिक कसे मिळाले? याबद्दलही त्यांनी भाष्य केले आहे. तसेच भारतात आतापर्यंत चुकीचा इतिहास शिकवला गेला. आर्य बाहेरून आलेले नसून ते आपले पूर्वज आहेत,असा दावा देखील केला.
नक्की वाचा : डॉ.व्ही.नारायणन इस्रोचे नवे प्रमुख;१४ जानेवारीला स्वीकारणार पदभार
अयोध्येतील राम मंदिराचे उद्घाटन आणि प्रभू श्रीरामाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेला वर्षपूर्ती होण्याच्या पार्श्वभूमीवर प्रभू श्रीरामांची महिमा सांगणारा ‘मिशन अयोध्या’ हा चित्रपट २४ जानेवारी रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. आर. के. योगिनी फिल्म्स प्रॉडक्शन निर्मित आणि समीर सुर्वे दिग्दर्शित ‘मिशन अयोध्या’ चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा महंत रामगिरी महाराज यांच्या उपस्थितीत ७ जानेवारी रोजी छत्रपती संभाजीनगर येथे पार पडला. यावेळी दिलेल्या प्रवचनात महंत रामगिरी यांनी राष्ट्रगीताबाबत भाष्य केले.
अवश्य वाचा : बीडमध्ये पोलीस कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या
रामगिरी महाराज काय म्हणाले ?(Mahant Ramgiri Maharaj)
छत्रपती संभाजीनगर येथील चित्रपट गृहात प्रवचन देत असताना महंत रामगिरी महाराज म्हणाले, “१९११ साली कोलकाता येथे राष्ट्रगीताचे निर्माते रवींद्रनाथ टागोर यांनी तत्कालीन ब्रिटिश राजा जॉर्ज पंचम यांच्यासमोर ‘जन गण मन’ हे गीत गायले होते. जॉर्ज पंचम राजा भारतावर अन्याय करत होता, त्यांच्या समर्थनार्थ आणि स्तुतीसाठी हे गीत गायले गेले. हे गीत राष्ट्राला संबोधित करत नाही, त्यामुळे भविष्यात याचाही विचार करावा लागेल.” म्हणून वंदे मातरम हेच देशाचे खरे राष्ट्रगीत असले पाहीजे, असे विधान त्यांनी केले. तसेच यासाठी आपल्याला संघर्षाची तयारी ठेवावी लागेल, असेही यावेळी ते म्हणाले.
रवींद्रनाथ टागोर यांच्या कार्याचे रामगिरी महाराजांकडून कौतुक (Mahant Ramgiri Maharaj)
रवींद्रनाथ टागोर लिखित गीताचा विरोध करत असतानाच टागोर यांच्या कार्याचे मात्र रामगिरी महाराज यांनी कौतुक केले. ते म्हणाले, रवींद्रनाथ टागोर यांचे कार्य मोठे आहे. त्यांनी शिक्षण संस्था उभारल्या. मात्र तुम्ही पाहा आजही शिक्षण संस्था चालविणाऱ्यांना राजसत्तेशी समन्वय साधावा लागतो. त्यावेळी ब्रिटिश राजवटीत शिक्षण संस्था चालवत असताना ब्रिटिशांना धरून राहावे लागत होते. म्हणून त्यांनी ब्रिटिशांची स्तुती केली असावी. या स्तुतीमुळेच टागोर यांना नोबेल पुरस्कार मिळाला, असेही महंत रामगिरी महाराज म्हणाले.