Ashadhi Wari 2024:आषाढी वारीतच घेतला अखेरचा श्वास;नाशिक येथील महाराजांचे नगर येथे हृदयविकाराने निधन 

संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज पायी पालखी सोहळा नगरमध्ये मुक्कामी आहे. या सोहळ्यातील दिंडी प्रमुख ह.भ.प रामनाथ महाराज शिलापूरकर (Ramnath Maharaj Shilapurkar) यांचे नगर येथे पहाटे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे.

0
Ashadhi Wari 2024:आषाढी वारीतच घेतला अखेरचा श्वास;नाशिक येथील महाराजांचे नगर येथे हृदयविकाराने निधन 
Ashadhi Wari 2024:आषाढी वारीतच घेतला अखेरचा श्वास;नाशिक येथील महाराजांचे नगर येथे हृदयविकाराने निधन 

Ashadhi Wari 2024: नगर : संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज पायी पालखी सोहळा नगरमध्ये मुक्कामी आहे. या सोहळ्यातील दिंडी प्रमुख ह.भ.प रामनाथ महाराज शिलापूरकर (Ramnath Maharaj Shilapurkar) यांचे नगर येथे पहाटे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. नाशिक त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर (Pandharpur) पायी पालखी सोहळ्यातील २७ नंबरचे दिंडीचे ते प्रमुख  होते. बुधवारी पहाटे नगर (Ahmednagar) येथे पालखी सोहळ्यातच त्यांना तीव्र हृदयविकाराचा धक्का आला आणि त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली.

नक्की वाचा : महाराष्ट्रासह ‘या’ राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा,हवामान खात्याकडून अलर्ट जारी

रामनाथ महाराज शिलापूरकर यांचे निधन (Ashadhi Wari 2024)

नाशिक जिल्ह्यातील ज्येष्ठ कीर्तनकार असलेले रामनाथ महाराज शिलापूरकर यांच्या निधनाची बातमी नाशिक जिल्ह्यात पसरल्याने संपूर्ण जिल्ह्यावर शोककळा पसरली आहेत. नाशिक जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी देखील  कीर्तनकार रामनाथ महाराज शिलापूरकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.

रामनाथ महाराज शिरापूरकर हे नाशिक जिल्ह्यातील शिरपूर येथील रहिवाशी आहेत. नाशिक जिल्ह्यातील नामसंकीर्तन सप्ताह सुरू करून जवळपास हजारो गाव खेड्यात रामनाथ महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली वर्षानुवर्षे सप्ताह सुरू आहेत. त्यामुळे शिलापूरकर महाराज यांच्या निधनाच्या बातमीने वारकरी संप्रदायावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

अवश्य वाचा : महाराष्ट्रासह ‘या’ राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा,हवामान खात्याकडून अलर्ट जारी

हृदयविकाराच्या धक्क्याने निधन (Ashadhi Wari 2024)

संतश्रेष्ठ निवृत्तीनाथांच्या पालखी सोहळ्यात २७ नंबरच्या पालखीचे रामनाथ महाराज शिलापूरकर हे दिंडी प्रमुख होते. गेल्या २० वर्षांपासून ते श्रीनाथांच्या पालखीत हजारो वारकरी पायी सोहळ्यात घेऊन जाण्याची नियोजन करत होते. मात्र, आज पहाटे नगर येथे श्री संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांच्या पालखी सोहळ्याच्या प्रसंगी त्यांच्यावर काळाने घाला घातला आणि तीव्र हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांचे निधन झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here