Ranapati Shivaray Swari Agra:’रणपति शिवराय स्वारी आग्रा’ सिनेमात ‘हा’ अभिनेता साकारणार शिवरायांची भूमिका

0
Ranapati Shivaray Swari Agra:'रणपति शिवराय स्वारी आग्रा' सिनेमात 'हा' अभिनेता साकारणार शिवरायांची भूमिका
Ranapati Shivaray Swari Agra:'रणपति शिवराय स्वारी आग्रा' सिनेमात 'हा' अभिनेता साकारणार शिवरायांची भूमिका

Ranapati Shivaray Swari Agra: दिग्पाल लांजेकर (Digpal Lanjekar) दिग्दर्शित ‘श्री शिवराज अष्टक’ ही मालिका आतापर्यंत प्रेक्षकांच्या मनावर ठसा उमटवण्यात यशस्वी ठरली आहे. आता या मालिकेतील सहावा चित्रपट ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ (Ranapati Shivaray Swari Agra) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या अष्टकात चिन्मय मांडलेकरनंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेसाठी एका नव्या अभिनेत्याची निवड झाली असून, या नावाची चर्चा सध्या मराठी मनोरंजन विश्वात रंगू लागली आहे.

 नक्की वाचा: ज्येष्ठ काँग्रेस नेते सुरेश कलमाडी यांचे निधन;’असा’होता त्यांचा पायलटपासून राजकारणापर्यंतचा प्रवास

कोण साकारणार शिवरायांची भूमिका? (Ranapati Shivaray Swari Agra)

शिवरायांच्या भूमिका कोण साकारणार या सस्पेन्सवर पडदा आता उठला आहे. ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका अभिनेता अभिजीत श्वेतचंद्र साकारणार आहे. स्वतः अभिजीतने सोशल मीडियावर महाराजांच्या भूमिकेतील पोस्टर शेअर करत ही माहिती जाहीर केली. त्याची ही पोस्ट समोर येताच चाहत्यांकडून कौतुकाचा आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अनेकांनी अभिजीतवर विश्वास व्यक्त करत,ही भूमिका तो समर्थपणे निभावेल,असा विश्वासही कमेंट्समधून व्यक्त केला आहे.

दिग्पाल लांजेकर यांच्या आधीच्या चित्रपटांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका अभिनेता चिन्मय मांडलेकरने साकारली होती. मात्र वैयक्तिक कारणांमुळे आणि ट्रोलिंगनंतर त्याने ही भूमिका पुढे न करण्याचा निर्णय घेतल्याचं स्पष्ट केलं होतं. त्यामुळे नव्या चित्रपटासाठी नव्या चेहऱ्याची निवड करण्यात आली.

अवश्य वाचा: निवडणुकीत ‘बिनविरोध’च्या तक्रारीत तथ्य आढळल्यास काय होणार ?

कोण आहे अभिजीत श्वेतचंद्र? (Ranapati Shivaray Swari Agra)

अभिजीत श्वेतचंद्र हा मराठी प्रेक्षकांसाठी नवा चेहरा नाही. ‘नवे लक्ष्य’, ‘शुभविवाह’, ‘आई तुळजाभवानी’ यांसारख्या मालिकांमधून त्याने छोट्या पडद्यावर स्वतःची ओळख निर्माण केली आहे. तसेच ‘सुभेदार’ आणि ‘शिवरायांचा छावा’ यांसारख्या चित्रपटांमधून ऐतिहासिक भूमिकांचा अनुभव ही त्याच्याकडे आहे.आता ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’मधून तो थेट छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत झळकणार आहे. हा चित्रपट शिवजयंतीच्या मुहूर्तावर म्हणजेच १९ फेब्रुवारी रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. शिवचरित्रातील हा शौर्यपूर्ण अध्याय आता मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.