नगर : सुपरस्टार महेश बाबू (Mahesh Babu) यांच्या सादरीकरणाखाली तयार झालेल्या ‘राव बहादूर’ (Rao Bahadur Movie) या चित्रपटाचे पहिले पोस्टर नुकतेच (First Poster Release) प्रदर्शित करण्यात आले आहे. त्यात अभिनेता सत्यदेव एका विलक्षण आणि प्रभावी रूपात दिसून येतो. प्रसिद्ध दिग्दर्शक वेंकटेश माहा दिग्दर्शित ही फिल्म एक नवीन आणि हटके संकल्पना घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
नक्की वाचा : इथे मृत्यूही ओशाळला! वाहनाला बांधून पतीला न्यावा लागला पत्नीचा मृतदेह
ही निर्मिती जीएमबी एंटरटेनमेंट, A+S मूवीज, श्रीचक्रा एंटरटेनमेंट्स आणि महायान मोशन पिक्चर्स यांच्या संयुक्त विद्यमाने होत आहे. ‘राव बहादूर’ या चित्रपटाचा जबरदस्त फर्स्ट लुक पोस्टर आणि शीर्षक दोन्ही समोर आले आहेत. या पोस्टरमध्ये सत्यदेव एका भव्य, राजेशाही पोशाखात, एक आगळंवेगळं रूप साकारताना दिसतोय. “शंका एक सैतान आहे” ही टॅगलाइनही उत्सुकता वाढवणारी आहे.
अवश्य वाचा : “आमच्या कुटुंबाला संघर्ष पाचवीलाच पुजलेला” – धनंजय मुंडे
सत्यदेवचा नवा अवतार (Rao Bahadur Movie)
सत्यदेवचा या चित्रपटातील लुक अत्यंत आकर्षक आणि वेगळा आहे. पोस्टरमध्ये मोरपिसं, बेलं आणि सूक्ष्म डिझाइन्सचा समावेश असून, ही दृश्यं भव्यतेसोबतच एक आंतरिक संघर्षही दर्शवतात. हे एक अतिशय वेगळं आणि प्रभावी सिनेमॅटिक अनुभव देणारे असणार, असा संकेत यातून मिळतो.
आपल्या भूमिकेबद्दल बोलताना सत्यदेव म्हणतात, “एक अभिनेता म्हणून तुम्ही अशा प्रकल्पांचे स्वप्न पाहता जे मोठे, आव्हानात्मक आणि लक्षात राहणारे असतात. ‘राव बहादूर’ तसं एक स्वप्नवत प्रोजेक्ट आहे. प्रत्येक सकाळी ५ तास मेकअपमध्ये घालवून मी या पात्रात पूर्णपणे शिरलो. जेव्हा शूटिंग सुरू झालं, तेव्हा मी केवळ अभिनय करत नव्हतो, तर मी स्वतः राव बहादूर म्हणून जगत होतो.”
जबरदस्त टीम आणि वेगळा दृष्टिकोन (Rao Bahadur Movie)
महेश बाबू आणि नम्रता शिरोडकर यांच्या GMB एंटरटेनमेंटसह, ‘राव बहादूर’ चित्रपटाचे दिग्दर्शन उमा महेश्वर उग्र रूपस्य यांसारख्या नावाजलेल्या चित्रपटांचे दिग्दर्शक वेंकटेश माहा करत आहेत. या चित्रपटाच्या निर्मितीत A+S मूवीज आणि श्रीचक्रा एंटरटेनमेंट्स यांसारख्या तेलुगु चित्रपटसृष्टीतील प्रतिष्ठित कंपन्यांचा सहभाग आहे. स्वातंत्र्य दिनी या चित्रपटाचं पहिलं विशेष दृश्य – ‘Not Even a Teaser’ – थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे आणि त्यानंतर येत्या आठवड्यात डिजिटल प्लॅटफॉर्म्सवर देखील दाखवण्यात येणार आहे. हा चित्रपट २०२६ च्या उन्हाळ्यात प्रदर्शित होणार आहे.