Rape Crime : अभिषेक कळमकर यांच्यावर अत्याचाराचा गुन्हा; नोकरीचे आमिष दाखवत लॉजवर नेऊन अत्याचार

0
Rape Crime : अभिषेक कळमकर यांच्यावर अत्याचाराचा गुन्हा; नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत लॉजवर नेऊन अत्याचार
Rape Crime : अभिषेक कळमकर यांच्यावर अत्याचाराचा गुन्हा; नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत लॉजवर नेऊन अत्याचार

Rape Crime : नगर : नगर शहराचे माजी महापौर (Ex Mayor) तथा राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर यांच्याविरोधात पंचवीस वर्षीय महिलेवर अत्याचार केल्याचा गंभीर गुन्हा (Crime) एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल झाल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. फिर्यादीच्या तक्रारीनुसार, शाळेत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत कळमकर यांनी तिला संपर्कात ठेवले. त्यानंतर नगर शहरातील विविध ठिकाणी तसेच पुणे (Pune) जिल्ह्यातील शिरूर येथील एका लॉजवर नेऊन तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

हे वाचा : शेतातील बांधावरुन जीवे मारण्याचा प्रयत्न; एमआयडीसी पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हा दाखल

व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत ब्लॅकमेलिंग

मोबाईलवर व्हिडिओ कॉल करून वेळोवेळी कपडे काढण्यास भाग पाडून त्रास देत असल्याचा आरोपही पीडितेने केला आहे. या सततच्या मानसिक व शारीरिक छळाला कंटाळून अखेर तरुणीने पोलिसांकडे धाव घेतली. अत्याचार करतानाचे व्हिडिओ काढून ते व्हायरल करण्याची धमकी देत ब्लॅकमेलिंग केल्याचाही गंभीर आरोपही फिर्यादीने केला आहे. या संदर्भातील काही व्हिडिओ पुरावेही पीडितेने पोलिसांकडे जमा केल्याची माहिती समोर आली आहे.

नक्की पहा : जय बजरंग विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या थ्रीडी कलाकृतीची क्रेझ

पोलिसांकडून शोध सुरू (Rape Crime)

गुन्हा दाखल होताच माजी महापौर कळमकर फरार झाल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली असून त्यांचा शोध सुरू आहे. या घटनेमुळे नगर शहरात संतापाची लाट उसळली असून राजकीय वर्तुळातही तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.