Pune Rape Case:“सर्व एसटी बसेसमध्ये जीपीएस आणि सीसीटीव्ही बसवण्याचे निर्देश”;प्रताप सरनाईक यांची माहिती 

0
Pune Rape Case:“सर्व एसटी बसेसमध्ये जीपीएस आणि सीसीटीव्ही बसवण्याचे निर्देश”;प्रताप सरनाईक यांची माहिती 
Pune Rape Case:“सर्व एसटी बसेसमध्ये जीपीएस आणि सीसीटीव्ही बसवण्याचे निर्देश”;प्रताप सरनाईक यांची माहिती 

Pune Rape Case : पुण्यातील स्वारगेट बस स्थानकावर(Swargate Bus Stand) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसमध्ये एका तरुणीवर अत्याचार (Rape Case) झाल्याची मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. मात्र या प्रकरणातील आरोपी अजूनही फरार आहे. या घटनेनंतर महिला प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशात महिला प्रवाशांच्या सुरक्षितते संदर्भात एस.टी महामंडळाची महत्त्वाची बैठक आज मंत्रालयात पार पडली. या बैठकीनंतर महिला प्रवाशांच्या सुरक्षितेसाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी राज्यातील महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसेसमध्ये सीसीटीव्ही (CCTV In Bus) आणि जीपीएस यंत्रणा (GPS System) बसवण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे.

नक्की वाचा :  ‘पुण्यातील अत्याचाराच्या घटनेत आरोपीवर कठोर कारवाई होईल’- एकनाथ शिंदे

सर्व बसेसमध्ये सीसीटीव्ही,जीपीएस अनिवार्य (Pune Rape Case)

एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांशी झालेल्या बैठकीनंतर मंत्री प्रताप सरनाईक यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सांगितले की, “आमच्या सर्व लाडक्या बहिणींना परिवहन मंत्री म्हणून मी आवाहन करतो की, घडलेली घटना अतिशय दुर्दैवी आहे. महाराष्ट्रात कुठेच अशी घटना घडता कामा नये. लाडक्या बहिनींना परिवहन मंत्री म्हणून माझी विनंती आहे की, तुम्ही पूर्वी ज्या पद्धतीने एसटी प्रवास करत होता ,तसाच तुमचा प्रवास सुरू ठेवा. प्रवाशांच्या सुरक्षतेसाठी आम्ही आजच्या बैठकीत सर्व बसेसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे आणि जीपीएस ट्रॅकिंग सिस्टम बसवण्याचे निर्देश दिले आहेत. याचबरोबर पुढील काळात एसटी बसेस आणि स्थानकांवर एआयचा वापरही करण्यात येणार आहे.”

अवश्य वाचा : प्रयागराजमधील महाकुंभात ६५ कोटी भाविकांनी केले स्नान   

या बैठकीतील महत्वाचे मुद्दे :(Pune Rape Case)


सर्व बसेसमध्ये सीसीटीव्ही, जीपीएस अनिवार्य करणार

सुरक्षा रक्षकांमध्ये महिलांची संख्या वाढवण्यावर भर दिला जाणार

सर्व बस डेपोचे ऑडिट करण्यात येणार

परिवहन विभागात आयपीएस अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याचा निर्णय

एसटी आगारातील भंगार वाहने १५ एप्रिल पर्यंत हटवण्यात येणार

शक्ती कायद्याच्या अंमलबजावणीसाठी केंद्राकडे पाठपुरावा करण्यात येईल

बस डेपोत स्वच्छतेला प्राधान्य देणार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here