Rasta Roko : श्रीरामपूर-नेवासा राज्यमार्गावर रास्ता रोको आंदोलन

0
Rasta Roko : श्रीरामपूर-नेवासा राज्यमार्गावर रास्ता रोको आंदोलन
Rasta Roko : श्रीरामपूर-नेवासा राज्यमार्गावर रास्ता रोको आंदोलन

Rasta Roko : श्रीरामपूर : राज्य सरकारने (State Govt) दूध दराबाबत शेतकऱ्यांच्या रास्त मागणीचा विचार करून योग्य तो निर्णय घेतला नाही, तर येत्या विधानसभा निवडणुकीत (Assembly Elections) दूध उत्पादक शेतकरी या सरकारला त्यांचा दणका दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा इशारा शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष ॲड.अजित काळे यांनी श्रीरामपूर येथील रास्ता रोको (Rasta Roko) आंदोलनात दिला.

Rasta Roko : श्रीरामपूर-नेवासा राज्यमार्गावर रास्ता रोको आंदोलन
Rasta Roko : श्रीरामपूर-नेवासा राज्यमार्गावर रास्ता रोको आंदोलन

अवश्य वाचा : नीलेश लंकेंनी इंग्रजीत घेतली खासदारकीची शपथ

दुधाचे भाव ढासाळल्याने आंदोलन

राज्यात दुधाचे भाव ढासाळल्याने शेतकरी संघटना व उंदीरगावश पंचक्रोशीतील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने हरेगाव फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनातमुळे नेवासा-श्रीरामपूर राज्य मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. रखरखत्या उन्हात शेकडोंच्या संख्येने दूध उत्पादक शेतकरी आंदोलनात उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.

नक्की वाचा : अफगाणिस्तानने रचला इतिहास,बांगलादेशला घरचा रस्ता दाखवत केला सेमीफायनलमध्ये प्रवेश

यावेळी उपस्थिती

यावेळी जिल्हाध्यक्ष अनिल औताडे, तालुकाध्यक्ष युवराज जगताप, शिवसेनेचे लखन भगत, संजय छलारे, वंदना मुरकुटे, सुदामराव औताडे, साहेबराव चोरमल, प्रभाकर कांबळे, डॉ. दादासाहेब अधिक, डॉ. विकास नवले, डॉ.रोहित कुलकर्णी, भास्कर तुवर,गोविंद वाघ, शरद असणे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here