Rasta Roko : अकोले : विद्यार्थिनीशी अश्लील चॅटिंग केल्याच्या आरोपावरुन येथील एका महाविद्यालयीन प्राध्यापकावर (Professor) निलंबनाची कारवाई करावी, या मागणीसाठी झालेल्या आंदोलनामुळे अकोलेत काही काळ तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली होती. सकल हिंदू समाजाच्या (Hindu Society) नेतृत्वाखाली येथील महात्मा फुले चौकात काही काळ रास्ता रोको (Rasta Roko) करण्यात आला. संबंधित संस्थेच्या सचिवांनी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी त्रिसदस्यीय चौकशी समिती नेमली जाईल, समितीच्या अहवालानंतर योग्य ती कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिल्यानंतर तणाव निवळला.
नक्की पाहा : श्रीगोंद्यात भरधाव कारने शाळकरी मुलांना उडवले
संबंधित प्राध्यापकाच्या विरोधात निषेधाच्या घोषणा
अकोले शहरातील एका महाविद्यालयातील प्राध्यापकाने विद्यार्थिनीशी अश्लील चॅटिंग केल्याच्या आरोपावरुन हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांना मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी महाविद्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ संबंधित प्राध्यापकाच्या विरोधात निषेधाच्या घोषणा दिल्या. तेथून हा जमाव पोलीस ठाण्यात गेला. तेथे यासंबंधी निवेदन देण्यात आले व संबंधित प्राध्यापकावर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.
अवश्य पाहा : मार्केटयार्ड चौकात अपघात ; एक ठार, चार जखमी
योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन (Rasta Roko)
यानंतर घोषणा देत जमाव महात्मा फुले चौक येथे गेला. काही काळ रस्त्यावरील दुकाने बंद करण्यात आली. त्यामुळे शहर बंद सारखी स्थिती निर्माण झाली होती. महात्मा फुले चौक येथे काही वेळ रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप करत संस्था पदाधिकारी व आंदोलक कार्यकर्त्यांमध्ये समन्वय साधला. यावेळी सकल हिंदू समाजाचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झालेले पाहायला मिळाले. संबंधित संस्थेच्या सचिवांनी या आरोपांबाबत त्रिसदस्यीय समिती नियुक्त करून चौकशीचा अहवाल आल्यानंतर योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर तणाव निवळला.