Rasta Roko Andolan : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राहुरीत रास्ता रोको आंदोलन

Rasta Roko Andolan : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राहुरीत रास्ता रोको आंदोलन

0
Rasta Roko Andolan : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राहुरीत रास्ता रोको आंदोलन
Rasta Roko Andolan : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राहुरीत रास्ता रोको आंदोलन

Rasta Roko Andolan : राहुरी: दुधाला, ऊसाला व पिकांना योग्य भाव मिळावा यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या (Swabhimani Shetkari Sanghatana) वतीने माजी खासदार शेतकरी नेते राजू शेट्टी (Raju Shetty)महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) नेत्यांनी राहुरी येथे शेतकऱ्यांसोबत रास्ता रोको आंदोलन (Rasta Roko Andolan) केले. तासभर चाललेल्या या आंदोलनामुळे नगर-शिर्डी महामार्गावर दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

Rasta Roko Andolan : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राहुरीत रास्ता रोको आंदोलन
Rasta Roko Andolan : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राहुरीत रास्ता रोको आंदोलन

नक्की वाचा: राज्यात जुलैमध्ये जास्त पावसाच्या सरी; हवामान विभागाचा अंदाज

प्रतिलिटर चाळीस रुपये भाव देण्याची मागणी

दुधाला प्रतिलिटर चाळीस रुपये भाव मिळाला पाहिजे. राज्य सरकारने सकारात्मक निर्णय न घेतल्यास राज्य भर होणाऱ्या तीव्र आंदोलनास राज्य सरकार जबाबदार राहील, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी यावेळी दिला. यावेळी माजी मंत्री आमदार प्राजक्त तनपुरे, शिवसेना जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे, रवींद्र मोरे आदी उपस्थित होते. यावेळी बैलगाडी, बैलजोडी घेवून आंदोलक महामार्गावर ठाण मांडून बसले होते. जोरदार घोषणाबाजी केली गेली. डफली वाजवत, दुधाचे कॅन रस्त्यावर ओतून केंद्र व राज्य सरकारचा निषेध केला गेला.

Rasta Roko Andolan : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राहुरीत रास्ता रोको आंदोलन
Rasta Roko Andolan : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राहुरीत रास्ता रोको आंदोलन

अवश्य वाचा: सत्संगात चेंगराचेंगरी होऊन 107 जणांचा मृत्यू

यावेळी राजू शेट्टी म्हणाले (Rasta Roko Andolan)

संघर्ष संपणारा नाही. सरकार कोणाचेही असो संघर्ष करावा लागणार. उद्योगपतींना केंद्र सरकार कोट्यवधी रुपयांची कर्जमाफी देते. केंद्र व राज्य सरकारने शेतकऱ्यांना आर्थिक संकटात टाकलेले आहे. कापूस, कांदा,सोयाबीन, ऊस, साखर या शेतीमालाचे बाबतीत आयात निर्यात धोरणांचा मोठा फटका उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. त्यामुळेच सरसकट पूर्ण कर्जमाफी करुन सातबारा कोरा केला पाहिजे, ही आमची मागणी आहे. सरकारी धोरणामुळे शेतकरी आज कर्जबाजारी आहे. उत्पादन खर्चापेक्षा कमी भावाने शेतीमाल विकावा लागला. दूधाला किमानचाळीस रुपये भाव मिळावा, ही माफक मागणी आहे. 

आमदार प्राजक्त तनपुरे म्हणाले, राज्य सरकार गेंड्याच्या कातडीचे आहे. अनुदानासाठी सरकारच्या अटी अत्यंत जाचक आहेत. दूध उत्पादकांना  लाभ मिळालाच नाही. दोन वर्षात पीकविमा नूकसान भरपाई मिळाली नाही. विविध योजनांंचे लाभार्थींचे जिल्ह्यात चाळीस कोटी रुपये दीड वर्षांपासून थकीत आहेत .शेतीमालाला  हमीभाव नाहीत. हे सरकार असंवेदनशील आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे, स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे, प्रकाश देठे, सुनील जगताप, एम. डी. सोनवणे यांची यावेळी भाषणे झाली. मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार संध्या दळवी यांनी स्वीकारले. बाबासाहेब भिटे, सुरेश निमसे, सतीश पवार, संदीप आढाव, शरद डुकरे, अविनाश पेरणे, राहुल तमनर, सचिन उंडे, जुगल गोसावी, अनिकेत कुलकर्णी, अनिल पेरणे, सचिन म्हसे, संदीप कोबरणे, अतुल वराळे, विलास वराळे, महेश उदावंत, संतोष आघाव, नितीन बाफना, गणेश कोहकडे, सतीश माने, श्रीकांत मेहेत्रे, सुरज आमटे आदी कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here