Rasta Roko Andolan : जखणगाव घटनेच्या निषेधार्थ रास्ता रोको आंदोलन

Rasta Roko Andolan : जखणगाव घटनेच्या निषेधार्थ रास्ता रोको आंदोलन

0
Rasta Roko Andolan : जखणगाव घटनेच्या निषेधार्थ रास्ता रोको आंदोलन
Rasta Roko Andolan : जखणगाव घटनेच्या निषेधार्थ रास्ता रोको आंदोलन

Rasta Roko Andolan : नगर : जखणगाव येथील अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग (Abuse of a minor girl) करण्याचा प्रयत्न करणाऱ्या सहआरोपींना (Co-Accused) तात्काळ अटक करावी या मागणीसाठी नगर-कल्याण महामार्गावर (Nagar-Kalyan Highway) जखणगाव येथे आज सकाळी दहा वाजता रास्ता रोको आंदोलन (Rasta Roko Andolan) करण्यात आले. सहआरोपीना अटक न झाल्यास दोन दिवसांनी तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल, असा इशारा यावेळी पोलीस (Police) प्रशासनाला दिला. सहआरोपीना अटक केली जाईल, असे आश्वासन यावेळी तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रल्हाद गिते यांनी दिला.

नक्की वाचा: लाडक्या बहिणींना सन्मानाने त्यांचा हक्क दिला जात आहे : गोऱ्हे

अटक न झाल्यास रास्ता रोको आंदोलन करण्याबाबतचे निवेदन

जखणगाव येथे पाच सहा दिवसांपूर्वी अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. याबाबत नगर तालुका पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीला अटक करण्यात आली. मात्र, या प्रकरणी सहआरोपींना तात्काळ अटक न झाल्यास ग्रामस्थांतर्फे रास्ता रोको आंदोलन करण्याबाबतचे निवेदन दिले होते.

अवश्य वाचा: बदलापूरच्या आंदोलनात लाडकी बहीण योजनेच्या विरोधात पोस्टर्स आले कसे?;मुख्यमंत्र्यांचा सवाल

गुन्हा दडपण्यासाठी मुलीच्या कुटुंबीयांना धमकी (Rasta Roko Andolan)

जखणगाव मधील अल्पवयीन मुलीवर अतिप्रसग करण्याचा प्रयत्न करण्यात आला व सदर गुन्हा दडपण्यासाठी मुलीच्या कुटुंबीयांना धमकी व अमानुष मारहाण करण्यात आली. याबाबत तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. यात मुख्य आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. मात्र, सहआरोपी अध्यापही मोकाट फिरत आहेत व अप्रत्यक्षपणे मुलींच्या कुटुंबीयांवर दबाव व धमकी देण्याचा प्रकार घडत आहेत. ही अतिशय गंभीर बाब आहे. प्रशासनातर्फे याची गंभीर दखल न घेतल्यामुळे सहआरोपी अजूनही मोकाट फिरत आहेत. पोलीस प्रशासनातर्फ या घटनेची गंभीर दखल न घेता आरोपीना मोकाट सोडून मुलीला किंवा तिच्या कुंटुबियांना काही इजा किंवा त्रास झाल्यास प्रशासन जबाबदार असेल. या घटनेचे गांभीर्य ओळखून इतर सहआरोपींना तात्काळ २४ तासांच्या आत अटक करावी, असे निवेदनात म्हटले आहे.

यावेळी सरपंच डॉ. सुनील गंधे, माजी जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले, पंचायत समिती माजी उपसभापती डॉ. दिलीप पवार, समता परिषद तालुका अध्यक्ष रामदास फुले, बाळासाहेब कर्डिले, बाळासाहेब शहाणे, मनोहर काळे, तात्यासाहेब कर्डिले, संजय जपकर, प्रकाश कुलट, राजू नरवडे, बी.आर. कर्डिले आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here