Rasta Roko Andolan : अकोले : अवैध दारु विक्रीविरुद्ध (Illegal Liquor Sale) भर पावसात आदिवासी भागातील महिला व पुरुषांनी वारंघुशी फाट्यावर (ता.अकोले) रविवारी दोन तास रास्ता रोको आंदोलन (Rasta Roko Andolan) केले. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक (Transportation) काही काळासाठी बंद झाली होती.
नक्की वाचा: मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान जिल्ह्यातील प्रत्येक गावात यशस्वीपणे राबवा
लेखी आश्वासनानंतर थांबवलेआंदोलन
अनेकदा पोलिसांना निवेदन देऊनही दारु विक्री थांबत नसल्याने शेवटी संतापून भर पावसात आदिवासी भागातील महिला, सरपंच, कार्यकर्ते, नागरिक यांनी रास्ता रोको आंदोलन केले. सरपंच, उपसरपंच यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले. पोलीस व उत्पादन शुल्क अधिकारी यांनी अवैध दारु विक्री थांबविण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतरच आंदोलन थांबवण्यात आले.
अवश्य वाचा : गणेशोत्सवानिमित्त १९ वर्षां खालील खेळाडूंसाठी जिल्हास्तरीय बुद्धिबळ निवड चाचणी स्पर्धा
आंदोलकांनी मांडल्या मागण्या (Rasta Roko Andolan)
दारुबंदी आंदोलनाचे प्रमुख कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी व राष्ट्रवादी किसान सभेचे प्रदेशाध्यक्ष अॅड. वसंत मनकर यांनी आंदोलनाला भेट देऊन पाठिंबा व्यक्त केला. याप्रसंगी आजूबाजूच्या गावातील अनेक महिलांनी दारुमुळे होणारे त्रास, घरातील हिंसाचार व तरुणांचे झालेले मृत्यू याबाबत आपली करुण कहाणी कथन केली. उत्पादन शुल्कच्या अधिकार्यांसमोर कुलकर्णी यांनी आंदोलनाच्या मागण्या मांडल्या. वारंघुशी व आजूबाजूच्या ज्या ज्या गावात अवैध दारु विकली जाते, तेथील विक्री त्वरीत बंद व्हावी. आजपर्यंत जितके गुन्हे या विक्रेत्यांवर दाखल झाले आहेत, ते सर्व गुन्हे एकत्र करून त्यांच्यावर तडीपारची कारवाई व्हावी व त्यांच्या उतार्यावर दंड बसवला जावा. ज्या बीट अंमलदाराकडे ही गावे आहे त्या अंमलदारावर कारवाई करून त्यांची बदली केली जावी. शेंडी, भंडारदरा येथील ज्या परवानाधारक दुकानातून ही दारु येते त्या दुकानाचे ऑडिट करून ते दुकान सील करण्यात यावे. त्याचप्रमाणे राजूर हे दारुबंदीचे गाव असल्याने व आदिवासी गावांचे मुख्य केंद्र असल्याने तिथे पोलीस निरीक्षक हे स्वतंत्र पद निर्माण करण्यात यावे. सरपंच फसाबाई बांडे व उपसरपंच समीर मुठे यांनी जनतेच्या संयमाची परीक्षा पाहू नये. अन्यथा गावागावांतील लोक अवैध दारु अड्डे उध्वस्त करतील असा इशारा दिला. यावेळी उत्पादन शुल्क अधिकारी सहस्त्रबुद्धे व सहायक पोलीस उपनिरीक्षक दीपक सरोदे यांनी अवैध दारु बंद होईल, असे लेखी आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलन थांबले.