Rasta Roko Andolan : अकोले : तालुक्यातील लिंगदेव येथील शेतकऱ्याच्या कानशीलात मारणारे आमदार डॉ. किरण लहामटे (MLA Dr. Kiran Lahamte) यांचे निषेधार्थ गुरुवारी (ता.२०) अकोल्यात रास्ता रोको आंदोलन (Rasta Roko Andolan) करण्यात येणार असल्याचे निवेदन कानडी समाज व तालुक्यातील सजग नागरिकांनी तहसीलदारांना (Tehsildar) दिले आहे.
अवश्य वाचा : केंद्र सरकारकडून बिबट नसबंदीची मान्यता; वनमंत्री गणेश नाईक
लहामटे यांच्या कृत्याचा तीव्र निषेध व्यक्त
लिंगदेव येथील शेतकरी वाळीबा होलगीर यांना आमदार डॉ. किरण लहामटे यांनी मारहाण केल्याच्या घटनेच तीव्र पडसाद अकोले तालुक्यात उमटताना दिसत आहे. समाज माध्यमातून आमदार लहामटे यांच्या या कृत्याचा तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे. दोन दिवसांपूर्वी लिंगदेव येथे वाचनालय इमारतीच्या उद्घाटनानिमित्त आमदार आले असता लिंगदेव गावातील सर्वसामान्य शेतकरी वाळीबा होलगीर यांनी “दिवसा वीज देण्यात यावी, रात्री बिबट्यांची खूप भीती आहे” हा प्रश्न विचारण्याआधीच आमदार लहामटे यांनी संबंधित शेतकरी वाळीबा होलगीर यांच्या कानशीलात लगावली.
नक्की वाचा : संगमनेर नगराध्यक्षपदासाठी सुवर्णा खताळ विरुद्ध डॉ. मैथिली तांबे ‘दुरंगी’ लढत रंगणार
महात्मा फुले चौकात रास्ता रोको आंदोलन (Rasta Roko Andolan)
या घटनेच्या निषेधार्थ सोमवारी लिंगदेव ग्रामस्थ व कानडी समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी निषेध सभा घेत आमदारांच्या कार्यपद्धतीवर टीकास्त्र सोडले होते. या घटनेचे तीव्र पडसाद तालुक्यातील राजकीय क्षेत्रात उमटले आहे. अनेकांनी सोशल मीडियातून आमदारांच्या या वृत्तीचा निषेध केला आहे. याच पार्श्वभूमीवर कानडी समाज व तालुक्यातील सजग नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त करत गुरुवारी सकाळी ११ वाजता अकोले येथील महात्मा फुले चौकात रास्ता रोको आंदोलन करणार असल्याचे निवेदन तहसीलदार डॉ. सिद्धार्थ मोरे व पोलीस निरीक्षक मोहन बोरसे यांना दिले आहे. या निवेदनावर कानडी समाजाचे भगवान म्हतारबा करवर, लहानू निवृत्ती सदगीर, पंढरीनाथ विठोबा चावडे, विठ्ठल सावळेराम होलगीर, एकनाथ विष्णू बेनके आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.



