Rasta Roko Andolan : श्रीगोंदा: कोळगाव येथील ग्रामीण रुग्णालय (Rural Hospital), रस्ता, तसेच परिसरातील विविध विकास कामाबाबत तसेच कांदा व दूधाला हमीभाव मिळण्यासाठी नगर-दौंड रस्त्यावर (Nagar-Daund Road) कोळगाव फाटा येथे ग्रामस्थांकडून आयोजित रस्ता रोको आंदोलन (Rasta Roko Andolan) अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर मागे घेण्यात आला.
अवश्य वाचा: ऊसतोड कामगार महिलेची रस्त्यातच प्रसुती; जेऊर परिसरात घडली घटना
रुग्णालय चालू करण्याची मागणी
यावेळी बाळासाहेब नलगे, हेमंत नलगे, विश्वास थोरात, मच्छिंद्र नलगे, सुभाष लगड, चिमणराव बाराहाते, स्वप्निल धस, विजय नलगे, संजय नलगे, भरत डुबल, बंडू कवडे, नंदू लगड, पद्माकर गाडेकर, प्रतिभा धस, बाळासाहेब शिरसाठ, किरण धस यासह ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी आंदोलकांकडून कोळगाव येथील ग्रामीण रुग्णालयासाठी स्टाफची पूर्तता लवकरच करून रुग्णालय चालू करण्याची मागणी करण्यात आली.
नक्की वाचा : जामीनावर बाहेर आलेली रील स्टार कोमल काळे पुन्हा पोलिसांच्या ताब्यात
रस्त्यासह कांदा व दुधाला हमीभावासाठी आंदाेलन (Rasta Roko Andolan)
रखडलेल्या कोळगाव फाटा ते ढोरजा रस्त्याचे काम सुरू करावे, कोळगाव ते वेठेकरवाडी खराब झालेला रस्त्या दुरुस्त करावा, कोळगाव येथील श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपबाजार करावा, संविधान भवनचे काम गट नंबर 723 मध्ये सुरू करावे तसेच शेतकऱ्यांच्या कांदा व दुधाला हमीभाव देण्याची मागणी निवेदनाद्वारे यावेळी करण्यात आली.
सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता विजय होके यांनी आठ दिवसात रस्त्याचे काम सुरू करण्याचे आश्वासन दिले. तर मंडलाधिकारी चौधरी, आरोग्य विभागाचे ठोकळ यांनी आंदोलकांना दिलेले निवेदन वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठवून देत पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.



