Rasta Roko Movement : शहरातील रस्त्यासाठी पारनेरकर एकवटले; एक तास रास्ता रोको

Rasta Roko Movement : शहरातील रस्त्यासाठी पारनेरकर एकवटले; एक तास रास्ता रोको

0
Rasta Roko Movement : शहरातील रस्त्यासाठी पारनेरकर एकवटले; एक तास रास्ता रोको
Rasta Roko Movement : शहरातील रस्त्यासाठी पारनेरकर एकवटले; एक तास रास्ता रोको

Rasta Roko Movement : पारनेर : पारनेर शहरातील (Parner City) मुख्य रस्त्यांची चाळण झाल्याने संतापलेल्या नागरिकांनी आज (ता. २३) सोमवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास आक्रमक पवित्रा घेत ‘रास्ता रोको’ आंदोलन (Rasta Roko Movement) केले. ‘समस्त पारनेर शहरवासीयांच्या वतीने करण्यात आलेल्या या आंदोलनामुळे शहरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर सार्वजनिक बांधकाम विभागाने (Public Works Department) कामाचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलकांनी आपला पवित्रा मागे घेतला.

नक्की वाचा : अहिल्यानगरचा संकल्प थोरात यंग ऑलिम्पिकचा ॲम्बेसेडर; करणार भारताचे प्रतिनिधित्व

बांधकाम विभाग दुर्लक्ष करत असल्याचा आरोप

गेल्या अनेक महिन्यांपासून पारनेर शहरातील हिंद चौक ते क्रीडा संकुल आणि गणपती फाटा या प्रमुख मार्गांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. “रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता?” अशी विचारणा करत वाहनधारक आणि पादचाऱ्यांनी प्रशासनाविरुद्ध रोष व्यक्त केला. वारंवार पाठपुरावा करूनही बांधकाम विभाग दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत, आज शेकडो नागरिक मारुती मंदिर परिसरात एकवटले आणि रास्ता रोको आंदोलन केले. आंदोलनाची तीव्रता पाहून सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता सुबोध वसईकर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. आंदोलकांनी यावेळी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. जोपर्यंत ठोस लेखी आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत रस्ता मोकळा न करण्याची भूमिका आंदोलकांनी घेतली होती.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

नागरिकांनी व्यक्त केले समाधान (Rasta Roko Movement)

अखेर प्रशासनाने आंदोलकांना लेखी पत्र दिले. त्या मध्ये नमूद करण्यात आले आहे की, शहरातील खड्डे डांबराचा वापर करून तातडीने बुजवण्यात येतील. रस्त्याच्या नवीन कामासाठी आवश्यक असलेले सर्वेक्षण १ तारखेपासून सुरू करण्यात येईल. हे सर्वेक्षण पुढील १५ दिवसांत पूर्ण करून कामाला गती दिली जाईल.प्रशासनाच्या या आश्वासनानंतर नागरिकांनी समाधान व्यक्त केले असले तरी हा लढा संपलेला नाही, असा इशारा आंदोलकांनी दिला आहे. “जर  १ तारखेपासून प्रत्यक्ष कामाला किंवा सर्वेक्षणाला सुरुवात झाली नाही, तर यापेक्षाही तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल,” असे शहरवासीयांनी स्पष्ट केले.

या आंदोलनामुळे शहराची वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. पोलीस उपनिरीक्षक चांगदेव हंडाळ व पंढरकर यांनी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर पोलिसांनी मध्यस्थी करत वाहतूक सुरळीत केली.