Rasta Roko Movement : रस्त्याच्या कामासाठी रास्ता रोको आंदोलनाचा इशारा 

0
Rasta Roko Movement : रस्त्याच्या कामासाठी रास्ता रोको आंदोलनाचा इशारा 
Rasta Roko Movement : रस्त्याच्या कामासाठी रास्ता रोको आंदोलनाचा इशारा 

Rasta Roko Movement : पाथर्डी : तालुक्यातील करोडी ते टाकळी मानूर हा रस्ता मंजूर होऊन सुद्धा होत नाही. या गोष्टीला लोकप्रतिनिधी जबाबदार असून मंजुरी मिळूनही हे काम होत नसल्याने आता सर्वपक्षीय कार्यकर्ते आंदोलनाच्या भूमिकेत उतरले आहेत. रस्त्याचे काम व महावितरणच्या (Mahavitaran) गलथान कारभाराविरोधात बुधवारी (ता.६) आंदोलन करणार असल्याचा इशारा कृषी उत्पन्न बाजार समितीचे (Agricultural Produce Market Committee) माजी सभापती गाहिनाथ शिरसाट (Gahininath Shirsat) यांनी दिला आहे.

हे देखील वाचा : भाजप हटाव…देश बचाव; ‘आयटक’ची राज्यव्यापी महासंघर्ष यात्रा उद्या नगरमध्ये


पाथर्डी तालुक्यातील रस्त्याचे काम व महावितरणच्या गलथान कारभाराच्या विरोधात नागरिकांच्या होणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन तालुक्यातील करोडी येथे ६ डिसेंबर रोजी सर्वपक्षीय रास्ता रोको (Rasta Roko Movement) आंदोलन करण्याबाबतचे निवेदन प्रांताधिकारी प्रसाद मते यांना देण्यात आले.

नक्की वाचा : सरकार आरक्षणाची मर्यादा वाढवण्याच्या तयारीत; हालचालींना वेग

यावेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे गहिनीनाथ शिरसाट, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे तालुका प्रमुख भगवान दराडे, शिवसेना शिंदे गटाचे तालुकाप्रमुख विष्णुपंत ढाकणे, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष नासिर शेख, वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष भोरू म्हस्के, माजी नगरसेवक बंडूपाटील बोरुडे, वैभव दहिफळे, पांडुरंग शिरसाट, डॉ. राजेंद्र खेडकर,सुरेश बडे, अमोल बडे, जुनेद पठाण, राहुल ढाकणे , नवनाथ उगलमुगले, राजेंद्र नांगरे, जालिंदर काटे, रविंद्र पालवे, राजेंद्र गाडे, विजय शिरसाट आदींच्या स्वाक्षरीचे निवेदन प्रांताधिकारी, तहसीलदार व पोलीस निरीक्षक यासह संबंधित विभागाला दिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here