Ratan Tata | प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा कालवश; वयाच्या ८६व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

0
Ratan Tata

Ratan Tata | नगर : भारतातील (India) प्रसिद्ध उद्योगपती रतन नवल टाटा (वय ८६) (Ratan Tata) यांचे काल (ता. ९) मध्यरात्री अल्पशा आजाराने निधन झाले. भारतीय उद्योगक्षेत्राचा जगभरात दबदबा निर्माण करण्याचे काम त्यांनी केले.

ते १९९० ते २०१२ या कालावधीत टाटा उद्योग समूहाचे (Tata Group) अध्यक्ष होते. तर २०१६ ते २०१७ या कालावधीत ते टाटा समूहाचे अंतरिम अध्यक्ष होते. त्यांच्याच काळात टाटा मोटर्स कंपनीने कोरस, टेटली, जॅग्वार कार्स या सारख्या मोठ्या कंपनीला खरेदी केल्या. त्यामुळे वाहन निर्मिती उद्योगात भारताचा जगभरात दबदबा वाढला. टाटा समूहाच्या तोट्यात जाणाऱ्या कंपन्यांना त्यांनी मोठ्या नफ्यात आणले. भारत सरकारने त्यांना २०००मध्ये पद्मभूषण तर २००८मध्ये पद्मविभूषण पुरस्कार देऊन गौरवले होते. महाराष्ट्र सरकारने मागील वर्षी त्यांनी महाराष्ट्र उद्योगरत्न पुरस्कार दिला होता. त्यांनी मुंबईतील ब्रिज कॅन्डी रुग्णालयात काल मध्यरात्री अखेरचा श्वास घेतला.

देशातील कोट्यावधी नागरिकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्याचं काम टाटांनी केलं. कोट्यावधी लोकांच्या रोजगाराचा प्रश्न सोडवला. देशाच्या अर्थव्यवस्थेला बळ दिलं. विकसित भारताच्या जडणघडणीत मोठं योगदान दिलं. आज भारत जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनला आहे त्यात टाटा उद्योग समूहाचाही मोठा वाटा आहे.

नक्की वाचा : देशातील गरिबांना पुढील चार वर्षे मोफत धान्य मिळणार,मोदी सरकारचा निर्णय

रतन टाटांचा जन्म (Ratan Tata)

देशातील सर्वाधिक लोकप्रिय उद्योजक आणि अब्जाधीश रतन टाटा यांचा जन्म २८ डिसेंबर १९३७ रोजी झाला होता. १९९१ ते २०१२ या कालावधीत रतन टाटा हे टाटा ग्रुपचे अध्यक्ष होते. या काळात त्यांनी उद्योग क्षेत्रात अनेक कीर्तीमान स्थापित केले. टाटा समूहाला त्यांनी एक वेगळे स्थान प्राप्त करून दिले. त्याचबरोबर एक उदारवादी माणूस म्हणूनही त्यांनी नाव मिळवले. हेच कारण आहे की, देशातील अगदी लहान व्यापारी असो की मोठा उद्योजक अथवा उद्योग विश्वात दाखल होणारा प्रत्येक जण रतन टाटांना आपला आदर्श मानतो.

अवश्य वाचा: १०५८ उमेदवारांना एसटीच्या सेवेमध्ये सामावून घेणार-भरत गोगावले

टाटा स्टील पासून सुरुवात (Ratan Tata)

रतन टाटा यांचा जन्म नवल टाटा आणि सुनी टाटा यांच्या घरी झाला होता. रतन टाटा लहान असतानाच त्यांचे माता पिता विभक्त झाले होते. त्यामुळे आजीनेच रतन टाटांचा सांभाळ केला. सुरुवातीचे शिक्षण घेतल्यानंतर १९५९ मध्ये रतन टाटांनी आर्किटेक्चर आणि स्ट्रक्चरल इंजिनिअरींगचे शिक्षण घेतले. नंतर अमेरिकेतली कॉर्नेल युनिव्हर्सिटीत गेले. यानंतर १९६२ मध्ये भारतात परतले. येथे आल्यानंतर रतन टाटांनी टाटा स्टील कंपनीतून उद्योगविश्वात पाऊल ठेवलं. सुरुवातीला रतन टाटा यांनी कर्मचारी म्हणूनच कामाला सुरुवात केली होती.

टाटा समूहाची कमान स्वीकारली (Ratan Tata)

रतन टाटा २१ वर्षांचे असतानाच त्यांना टाटा समूहाचे अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले. यानंतर टाटांनीही आपली जबाबदारी ओळखत अथक परिश्रम केले. उद्योग समूहाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. त्यांनी २०१२ पर्यंत टाटा समूहाचं नेतृत्व केले. १९९६ मध्ये टाटा यांनी टाटा टेली सर्विसेस ही टेलिकॉम कंपनी स्थापन केली. २००४ मध्ये टाटा कन्सल्टन्सी सर्विसेस (टीसीएस) कंपनीला मार्केटमध्ये लिस्ट केले. भारत सरकारने पद्मभूषण (२०००) आणि पद्म विभूषण (२००८) या पुरस्कारांनी रतन टाटांचा गौरव केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here