Ravichandran Ashwin: रविचंद्रन अश्विनच्या कसोटीत ५०० विकेट्स पूर्ण

रविचंद्रन अश्विनने कसोटीत ५०० बळींचा टप्पा गाठला . भारतीय ऑफस्पिनरने इंग्लिश फलंदाज जॅक क्रॉलीला बाद करून कसोटी प्रकारात ही कामगिरी केली.

0
Ravichandran Ashwin
Ravichandran Ashwin

नगर : भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) यांच्यात राजकोटमध्ये पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना खेळला जात आहे. या सामन्यातील इंग्लंडच्या पहिल्या डावात रविचंद्रन अश्विनने जॅक क्रॉलीला बाद करत मोठा पराक्रम केला आहे. त्याने कसोटीत ५०० विकेट्स पूर्ण केल्या आहेत. हा विक्रम करणारा तो जगातील नववा क्रिकेटपटू ठरला आहे. त्याचबरोबर तो भारताचा दुसरा आणि एकूण पाचवा फिरकी गोलंदाज आहे.अनिल कुंबळेच्या नावावर कसोटीत ६१९ विकेट्स आहेत.

नक्की वाचा : सर्व अनुदानित शाळांना सोलर पॅनल लावणार : डॉ. सुजय विखे पाटील

अश्विनची कसोटीतील ही ५००वी विकेट (Ravichandran Ashwin)

रविचंद्रन अश्विनने इंग्लंडला पहिला धक्का ८९ धावांवर दिला. अश्विनने जॅक क्रॉलीला रजत पाटीदारकडून झेलबाद केले. अश्विनची कसोटीतील ही ५००वी विकेट ठरली. हा आकडा गाठणारा तो भारताचा दुसरा गोलंदाज ठरला आहे. सर्वात जलद ५०० विकेट घेणारा भारतीय होण्याच्या बाबतीत अश्विन अनिल कुंबळेच्या पुढे गेला आहे.

अवश्य वाचा : छत्रपती शिवरायांची महती सांगणार ‘शिवबाचं गाणं’ आलं प्रेक्षकांच्या भेटीला

अश्विन कसोटीत ५०० बळी घेणारा नववा गोलंदाज (Ravichandran Ashwin)

कुंबळेने आपल्या १०५ व्या कसोटीत ५०० बळींचा टप्पा गाठला. अश्विनने आपल्या ९८ व्या कसोटीत ही कामगिरी केली. संपूर्ण जगात सर्वात वेगवान ५०० कसोटी बळींचा विक्रम मुथय्या मुरलीधरन च्या नावावर आहे. त्याने ८७ कसोटी सामन्यात हा पराक्रम केला आहे. त्याचबरोबर अश्विन कसोटीत ५०० बळी घेणारा नववा गोलंदाज ठरला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here