Ravikant Tupkar : साेयाबीन, कापूस प्रश्नी चर्चा फिसकटली; रविकांत तुपकरांचे आता गनिमी काव्याचे आंदाेलन

Ravikant Tupkar : साेयाबीन, कापूस प्रश्नी चर्चा फिसकटली; रविकांत तुपकरांचे आता गनिमी काव्याचे आंदाेलन

0

Ravikant Tupkar : नगर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे (swabhimani shetkari sanghatna) नेते रविकांत तुपकर हे शेती प्रश्नावरुन आक्रमक झाले आहेत. सोयाबीन, कापूस उत्पादकांच्या प्रश्‍नांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मंगळवारी (ता. १९) रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांच्या नेतृत्वात विधानभवनावर मोर्चा काढण्यात आला होता. या वेळी कृषिमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यासोबत शिष्टमंडळाची झालेली चर्चा फिसकटली. परिणामी, यापुढे सरकारसोबत चर्चा न करता छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्या गनिमी काव्याच्या नितीचा अवलंब करीत अधिक तीव्र आक्रमक आंदोलन करण्याचा इशारा तुपकर यांनी दिला.

हे देखील वाचा : शनिशिंगणापूर देवस्थानमधील भ्रष्टाचाराची चौकशी होणार ; शिंदे फडणवीस सरकारची घोषणा

सोयाबीन, कापूस उत्पादकांच्या प्रश्‍नांवर लक्ष वेधण्यासाठी तुपकर यांच्या नेतृत्वात हल्लाबोल मोर्चा विधानभवनावर नेण्याचे प्रस्तावित होते. मंगळवारी गौंडखेरीपासून याला सुरुवात झाली. झीरो माइलनजीक मोर्चाला पोलिसांनी अडवित मोर्चेकऱ्यांना ताब्यात घेतले. मोर्चेकऱ्यांची रवानगी सीआयडी कार्यालयात करण्यात आली होती. दरम्यान, तुपकर यांनी चर्चेसाठी न जाता शेतकऱ्यांना शासनासोबत चर्चेसाठी पाठविले. त्यामध्ये कर्जफेडीकरिता अवयव विक्रीसाठी काढणाऱ्या हिंगोली जिल्ह्यातील गजानन कावरखे यांचाही समावेश होता. परंतु, कृषिमंत्री व शिष्टमंडळाचे कोणत्याच विषयावर एकमत झाले नाही. त्यावरूनच सरकार शेतकऱ्यांप्रती गंभीर नसल्याचा आरोप करीत शिष्टमंडळाने चर्चास्थळावरून काढता पाय घेतला.

नक्की वाचा : मराठ्यांची नाराजी अंगावर घेऊ नका; मनाेज जरांगे पाटलांचा पुन्हा सरकारला इशारा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here