राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजप पदाधिकारी नियोजन बैठक!
Ravindra Anaspure : नगर : राज्यात आणि देशात भाजपा महायुतीचे सरकार आहे. राज्याचा वेगवान विकास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Chief Minister Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे. स्वच्छ आणि पारदर्शक कारभार राज्यात महायुती सरकारच्या माध्यमातून केला जात असून सर्वसामान्य शेतकरी जनता यांना केंद्रबिंदू मानून सरकार पुढे जात आहे. बेरोजगार तरुणांसाठी जास्तीत जास्त नोकरी उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे जनतेचा मोठा विश्वास या सरकारवर असला तरी भाजपा (BJP) कोणतीच निवडणूक हलक्यात घेत नाही, असे प्रतिपादन भाजपचे संघटन मंत्री रविंद्र अनासपुरे (Ravindra Anaspure) यांनी केले.
नक्की वाचा: विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या अमानुष वागणुकीबाबत खताळ यांनी वेधले लक्ष; कारवाईची मागणी
राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या अनुषंगाने नियोजन बैठक
राहुरी-नगर पाथर्डी विधानसभा पोटनिवडणुकीच्या अनुषंगाने भाजपाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची नियोजन बैठक बुऱ्हानगर येथे पार पडली. यावेळी संघटन मंत्री अनासपुरे म्हणाले, राहुरी मतदारसंघातील मतदारांनी आमदार शिवाजीराव कर्डिले यांना पाच वर्षासाठी निवडून दिले होते. वर्षभरानंतर त्यांचे निधन झाले असले तरी ती पूर्ण पाच वर्ष अक्षय कर्डिले यांच्या रूपाने कर्डिले कुटुंबाला दिली पाहिजेत अशी जनभावना मतदारसंघातील जनतेची आहे. त्यामुळे उमेदवार देखील तुमच्या मनातला दिला जाईल, असे म्हणत अनासपुरे यांनी या पोटनिवडणुकीत भाजपाकडून जो उमेदवार दिला जाईल व तो किमान एक लाख मतांची आघाडी घेऊन तीच खरी आमदार कर्डिले यांना लाख मतांची श्रद्धांजली ठरेल.
📣 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स व्हॉट्सॲपवर मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://whatsapp.com/channel/0029VbCCtgJ4IBhMHvG2cG3D
यावेळी अक्षय कर्डिले म्हणाले, (Ravindra Anaspure)
राहुरी विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक नागरिकाशी माझे नाते हे केवळ राजकीय नाही, तर कौटुंबिक आहे. माझे वडील नसताना माझ्या राजकीय प्रवासाची सुरुवात होईल असा मी कधीच विचार केला नव्हता. पण कार्यकर्त्यांनी दाखवलेले प्रेम आणि विश्वास मला नव्याने बळ देत आहे. स्व. आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी आम्हाला शिकवले की निवडणूक कधीच हलक्यात घेऊ नये. कार्यकर्त्यांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आणि एकजुटीने काम करावे.

गेल्या चार महिन्यांपासून मी जनतेच्या सुखदुःखात सहभागी होत आहे. जनतेने वडिलां इतकेच प्रेम माझ्यावरही आज करत आहे, हीच माझ्यासाठी खरी ताकद आहे. ही निवडणूक आपण संघटितपणे लढवायची आहे यश निश्चितपणे मिळणार आहे. स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांच्या ३० वर्षांच्या कार्याची पावती या निकालातून मिळेल. बैठकीदरम्यान उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांनी एकमुखाने अक्षय कर्डिले यांच्या उमेदवारीची मागणी केली
आणि त्यांना विधानसभेत पाठवण्याची ग्वाही दिली.
या बैठकीस संघटन मंत्री रवींद्र अनासपुरे, जिल्हा बँकेचे संचालक अक्षय कर्डिले, जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, शहराध्यक्ष अनिल मोहिते,चेअरमन भाऊसाहेब बोठे, व्हाईसचेअरमन रभाजी सुळ, शिवाजी सागर, सुरसिंग पवार, अमोल भानगडे, सर्जेराव घाडगे, अनिल आढाव, विक्रम भुजाडी, माजी सभापती काशिनाथ लवांडे, बाजीराव गवारे, बाळासाहेब अकोलकर, संभाजी पालवे, संदीप कर्डिले, अर्जुन पानसंबळ, अण्णासाहेब बाचकर, रंगनाथ गवते, विक्रम भुजाडी, धनंजय आढाव, युवराज गाडे, बाळासाहेब महाडिक, प्रसाद डोकरीकर, श्याम पिंपळे, दादा बोटे,सुनील साखरे, मिर्झा मणियार, शिवाजीराव पालवे, बाबाजी पालवे, गणेश पालवे, अनिल गीते, पुरुषोत्तम आठरे, कुशल भापसे, एकनाथ आटकर, वैभव खलाटे, संतोष शिंदे, धीरज मैड, नंदकुमार लोखंडे, मिराताई बांगर, डॉक्टर साक्षीताई कोरडे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तुमच्या मनातला उमेदवार देऊ
राहुरी नगर पाथर्डी विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे निधन झाल्यामुळे या मतदारसंघात पोटनिवडणूक घेण्याची वेळ आली असली तरी भाजपाकडून निवडणुकीच्या दृष्टीने केले जाणारे नियोजन रणनीती महत्त्वाची ठरणारे असते. पदाधिकारी कार्यकर्ता आणि बुथ प्रमुख यांची भूमिका फार महत्वाची असते निश्चितपणे तुमच्या मनातला उमेदवार या पोटनिवडणुकीत देऊ असा विश्वास अनासपुरे यांनी व्यक्त करताच कार्यकर्त्यांनी देखील मोठा जल्लोष केला.



