Ravindra Chavan : राहुरी : विधानसभा (Rahuri Assembly Constituency) पोटनिवडणूक कार्यकर्त्यांनी गांभीर्याने घ्यावी. अक्षय कर्डिले (Akshay Kardile) यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांनी केले. पोटनिवडणुकीत महायुतीचे उमेदवार म्हणून अक्षय कर्डिले यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर पांडुरंग लॉन्स येथे आयोजित विजयी निर्धार सभेत ते अध्यक्ष स्थानावरून बोलत होते.
अवश्य वाचा: मोबाईल व घरातील दागिने घेऊन नवरी पसार; पाथर्डी तालुक्यातील घटना
अक्षय कर्डिले मोठे भाग्यवान
ते पुढे म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे धोरण सबका साथ सबका विकास हे आहे. त्यासाठी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याशी आम्ही आज सकाळी चर्चा केली. विकासाच्या मुद्द्यावर आम्ही त्यांना बरोबर घेणार आहोत. हा दिवस ऐतिहासिक दिवस आहे. स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी वर्षानुवर्षे माणसे जोडली. ती मोठी संपत्ती आहे. या दृष्टीने अक्षय कर्डिले मोठे भाग्यवान आहेत. एवढ्या मोठ्या संख्येने जनतेचा आशीर्वाद त्यांना लाभलेला आहे .
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
तनपुरे यांच्याशी सकारात्मक चर्चा (Ravindra Chavan)
शेतकरी, कष्टकरी, तरुण ,महिला यांच्या सर्वांगीण विकासाचे राजकारणावर भाजपाचा भर आहे. त्यादृष्टीने माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याशी आज चर्चा झाली. ती सकारात्मक झाली. त्यांनी चांगला प्रतिसाद दिला. लादली गेलेली ही निवडणूक गांभीर्याने घ्या. तीन तालुक्यातील गावे मतदारसंघात आहेत. बुथ वरील लढाईसाठी सूक्ष्म नियोजन करा. चांगल्या मताधिक्याने विजयासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले.
सर्वांना बरोबर घेवून जाण्याचे आमचे धोरण
पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, विकासासाठी सर्वांना बरोबर घेवून जाण्याचे आमचे धोरण आहे. विकासासाठी आम्ही प्राजक्त तनपुरे बरोबरच आहोत. त्यांच्या सकारात्मक भूमिकेबद्दल मी त्यांचे आभार मानतो. विकासासाठी आम्ही सर्व एकत्रच आहोत. ही पोटनिवडणूक वेगळ्या वातावरणात होत आहे. कार्यकर्त्यांनी निवडणूक प्रचारात संयम ठेवला पाहिजे. आम्ही एम.आयडीसी साठी पूढाकार घेत आहोत. वांबोरी चारी दुसरा टप्पा लवकरच सुरू होईल. के.के. रेंज भूसंपादन रद्द केले. मुळाधरणातील गाळ काढून दोन टीएमसी ने पाणीक्षमता वाढविली जाईल. महायुतीचे उमेदवार अक्षय कर्डीले मोठ्या मताधिक्याने निवडून आले पाहिजेत. ऐतिहासिक विजय मिळवण्यासाठी कामाला लागा.
अक्षय कर्डीले म्हणाले की
युवानेते अक्षय कर्डीले म्हणाले, भारतीय जनता पक्षाने माझ्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे. ती मी पार पाडीन. आमदार शिवाजी कर्डीले यांच्या विचारांचा वारसा पुढे चालविला जाईल. पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील मला पितृवत प्रेम देत आहेत. मी स्वतःला त्यांचा पुत्र समजत आहे. पक्षातील सर्व विशेषतः आमदार मोनिकाताई राजळे यांनी बहिणीचे प्रेम दिले. जनतेने वडीलांची उणीव जाणवू दिली नाही. माझी जनतेशी बांधिलकी कायम राहील. शेवटच्या श्वासापर्यंत त्यांना ताकद देईल.
सर्वसामान्य व्यक्तीशी बांधिलकी कायम ठेवली जाईल
आमदार संग्राम जगताप म्हणाले, सर्व जणांनी आज अक्षय कर्डिले यांच्या मागे ताकद उभी केली. सर्वसामान्य व्यक्तीशी बांधिलकी कायम ठेवली जाईल. विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे म्हणाले , स्व. आमदार शिवाजीराव कर्डिले स्वकत्तृत्वाने पुढे आलेले होते. त्यांची सर्वसामान्य जनतेशी बांधिलकी होती. आमदार मोनिका राजळे यांनी प्रास्ताविक केले. युवा भाजपाचे अध्यक्ष कृष्णराज महाडिक, आमदार विठ्ठलराव लंघे, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष अशोक सामंत यांची यावेळी भाषणे झाली. आमदार अमोल खताळ, सुरेश धस, काशिनाथ दाते, महापौर ज्योती गाडे, माजी मंत्री बबनराव पाचपुते, भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, अनिल मोहिते आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी आमदार शिवाजी कर्डीले यांना श्रध्दांजली वाहण्यात आली.



