Raviraj Sabale Patil | अहिल्यानगरच्या आरोग्याधिकाऱ्यांनी बजावली नोटीस; रविराज साबळेंनी घेतलं फैलावर

0

Raviraj Sabale Patil | नगर : सोशल मीडियावरील रिलस्टार रविराज साबळे पाटील (Raviraj Sabale Patil) यांना एचपीव्ही लसीकरण (HPV Vaccination) कार्यक्रमावर टीका केली होती. या टीकेमुळे अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी रविराज साबळे यांना नोटीस बजावली होती. त्यानुसार रविराज साबळे आज (ता. १३) अहिल्यानगर जिल्हा परिषदेत आले होते. त्यांनी आरोग्य अधिकारी बापूसाहेब नागरगोजे यांना या नोटीस बाबत जाब विचारला. एचपीव्ही लसीकरणाचा कोणताही दुष्परिणाम नसल्याचे जाहीर करा. दुष्परिणाम असल्यास जबाबदारी स्वीकारण्याची तयारी दाखवा, असे म्हणतातच आरोग्य अधिकाऱ्यांनीही लेखी उत्तर देऊ, असे सांगितले. 

हेही वाचा – आता गॅस सिलिंडरचा पुरवठा होणार सुरळीत; राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय

लेखी उत्तर आल्यावर बोलू

साबळे पाटील यांनी उपस्थित पत्रकारांशी बोलताना सांगितले की, अहिल्यानगर जिल्हा परिषदेतील आरोग्य अधिकारी बापूसाहेब नागरगोजे यांनी नोटीस पाठवली होती. कोणतीही नोटीस पाठवताना एक नियम असतो. त्याचे म्हणणे मांडण्याचा नोटीस बाजावलेल्या व्यक्तीला अधिकार असतो. मात्र, नागरगोजे यांनी दिलेल्या नोटीसमध्ये तसा कोणताही उल्लेख नव्हता. मी नागरगोजे यांना विचारले की, तुम्ही कोणत्या नियमानुसार ही नोटीस दिली असे मी त्यांना विचारले. त्यांनी प्रश्नांची उडवा उडवीची उत्तरे दिली. तसेच त्यांनी लेखी उत्तर देऊ, असे सांगितले. याबाबत लेखी उत्तर आल्यावर बोलू, असे सूचक वक्तव्य साबळे यांनी केले.

अवश्य वाचा – अहिल्यानगर महापालिकेकडून भाड्याच्या उत्पन्नावर कर आकारणी; क्षेत्रफळानुसार आकारणी करण्याची शिवसेनेची मागणी

आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या नोटिसीत स्पष्ट

ते पुढे म्हणाले की, अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या नोटिसीत स्पष्ट म्हटले आहे की, आम्हाला पुणे उपविभागीय अधिकाऱ्यांकडून वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून दुरध्वनीवरून मिळालेल्या सूचनेनुसार नोटीस दिली आहे. त्यानुसार यंत्रणा कोणाची आहे. हे अधिकारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले होते की, या राज्याचा बॉस आहे. माझे आमदार, मंत्री बुजगावणी आहेत. त्यामुळे सामान्य माणूस म्हणून मी प्रत्येक प्रश्न मुख्यमंत्री फडणवीस यांना विचारतो, असे त्यांनी स्पष्ट केले.

माझे प्रश्न हे व्यवस्थेला

जीवे मारण्याच्या धमक्या मिळत असल्याबाबत त्यांनी सांगितले की, मी अंबी पोलीस ठाण्यात हजार पेक्षाही जास्त फिर्यादी दाखल केल्या आहेत. धमकी हा अदखलपात्र गुन्हा असल्याने पुढील कारवाई झाली नाही. माझे प्रश्न हे व्यवस्थेला आहेत. त्यातून कोणाला धोका निर्माण झाला आहे. महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्था नाही. माझ्या जीवाला धोका असल्याबाबत मुख्यमंत्र्यांना पाच वेळा पत्र लिहिले आहे. तरीही कोणतीही कारवाई झालेली नाही, असेही साबळे यांनी सांगितले.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी निवडणुकीपूर्वी कर्जमाफीच्या जोरदार घोषणा केल्या मात्र, निवडणूक झाल्यावर त्यांना कर्जमाफीचा विसर पडला आहे. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याची मागणी होती. ९० ते ९५ टक्के शेतकऱ्यांनी कर्ज नवे जुने केले. त्यांनी तसे केले नसते तर त्यांचे सिबील खराब झाले असते. त्यांनी ३० सप्टेंबर २०२५ तारीख दिली होती. ही कर्जमाफी फसवी आहे. जनतेच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम देवेंद्र फडणवीस करत असल्याचा आरोपही रविराज साबळे यांनी केला.

हे पहा – वडिलांचं स्वप्न मुलीनं केलं पूर्ण; संगमनेरची लेक झाली कलेक्टर!

लोणावळा पोलिसांनी केलेल्या कारवाईत २८ टन गोमांस जप्त करण्यात आले. त्याची किंमत होती ६० लाख रुपये. रेम्बल अॅग्रो अॅण्ड फुड कंपनीने त्या गोमांसवर दावा केला. वडगाव मावळ येथील प्रांताधिकाऱ्यांना कळाले की, जोडलेली कागदपत्रे व आढळलेले मांस यात तफावत आढळून आली. हैद्राबादवरून मुंबईला येणाऱ्या मांसाच्या तपासणीची कागदपत्रे उत्तर प्रदेशातील अलीगडची देण्यात आली. रेम्बल अॅग्रोचे व्यवस्थापकीय संचालक हे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कंपनीचे संचालक होते. यात कोणावर प्रश्नचिन्ह उपस्थित करायचे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here