RBI Repo Rate : मागील पाच वर्षांत पहिल्यांदाच आरबीआय अर्थात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं (Reserve Bank Of India) रेपो रेटमध्ये (Repo rate) कपात (Reduction) करण्याचा निर्णय घेतला आहे. बँकेने याआधीची व्याजदर कपात मे २०२० मध्ये जाहीर केली होती. याशिवाय गेल्या दोन वर्षांत आरबीआयनं व्याजदरात कोणतेही बदल केले नव्हते. मात्र आता आरबीआयकडून व्याजदर कपातीचा निर्णय जाहीर करण्यात आल्यामुळे त्याचा शेअर बाजारासोबतच भारतीय बाजारपेठेवर काय परिणाम होणार यावर चर्चा सुरु झाली आहे.
नक्की वाचा : लाडकी बहीण योजनेच्या प्रचारासाठी सरकारचा मोठा निर्णय
आता व्याजदर ६.५० टक्क्यांवरून ६.२५ टक्क्यांपर्यंत खाली घसरला (RBI Repo Rate)
रिझर्व्ह बँकेच्या सहा सदस्यीय मॉनिटरी पॉलिसी कमिटीच्या शुक्रवारी (ता.७) झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार आरबीआयने २५ बेसिस पॉइंटने व्याजदरात कपात केली आहे. त्यामुळे आता व्याजदर ६.५० टक्क्यांवरून ६.२५ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे.केंद्र सरकारनं यंदाच्या अर्थसंकल्पात १२ लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करण्याची घोषणा केल्यानंतर आठवड्याभरातच आरबीआयनं व्याजदर कपातीचा निर्णय जाहीर केला आहे.त्यामुळे आगामी काळात गृह व वाहन कर्जे स्वस्त होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
अवश्य वाचा : ‘ज्यांना कधी लंगोट घालण्याचं माहिती नाही,त्यांनी कुस्तीवर बोलू नये’- संग्राम जगताप
गृहकर्ज,वाहनकर्ज स्वस्त होणार (RBI Repo Rate)
आरबीआयच्या एमपीसी बैठकीत झालेला हा निर्णय कर्ज स्वस्त होण्यासाठी कारणीभूत ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.त्यामुळे येत्या काही दिवसांत घरासाठी घ्यावे लागणारे कर्ज,वाहनासाठी घ्यावे लागणारे कर्ज, यांच्यावरचे व्याजदर कमी होण्याची शक्यता आहे.अर्थात,ही कर्जे महाग होऊ शकतात.अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी या माध्यमातून लोकांच्या हाती जास्त पैसा शिल्लक राहिल्यामुळे त्यातून गुंतवणूक वाढू शकते, बाजारात पैसा येऊ शकतो,असा अंदाज वर्तवला जात आहे.
हा निर्णय जाहीर करताना आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा म्हणाले,“गेल्या काही वर्षांत या पद्धतीमुळे भारतीय अर्थव्यवस्थेला मोठा फायदा झाला आहे. विशेषत: कोरोना काळातील आव्हानांचा भारतीय अर्थव्यवस्थेला सामना करता आला आहे. यानंतर सरासरी महागाईचा दर कमी झाला आहे. व्याजदरासंदर्भातील या धोरणाचा अवलंब केल्यानंतर आरबीआयकडून नियोजित पद्धतीनेच मार्गक्रमण करण्यात आलं”,असं ते म्हणाले.