नगर : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आज (ता.५) नवीन पतधोरण (Credit Policy) जाहीर केले आहे. रेपो दरामध्ये आरबीआयने कोणतेही बदल न करण्याची घोषणा केली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तिकांत दास (Shaktikant Das) यांनी यासंदर्भात माहिती दिली. आरबीआयने सलग सात वेळा व्याजदरात कोणताही बदल केला नाही. रिझर्व्ह बँकेने ६.५ टक्के व्याजदर कायम ठेवला आहे. त्यामुळे कर्जदारांना दिलासा मिळणार आहे.
नक्की वाचा : गुजरातला होम ग्राऊंडवर पराभवाचा धक्का;पंजाबला मिळाला दुसरा विजय
रिझर्व्ह बँकेचा ६.५ टक्के व्याजदर कायम (RBI Repo Rate)
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या पुढील आढावा बैठकीपर्यंत हा ६.५ टक्के व्याजदर कायम राहणार आहे. त्यामुळे पुढील कमीत-कमी तीन महिने व्याजदरांमध्ये कोणताही बदल होणार नसल्याचे आज स्पष्ट झाले आहे. वैयक्तिक कर्ज, गृहकर्ज किंवा वाहनासाठी घेतलेल्या कर्जाच्या ‘ईएमआय’ मध्ये कोणतीही वाढ होणार नसल्याने कर्जदारांना दिलासा मिळालाय. रिझर्व्ह बँकची नवीन आर्थिक वर्षाची पहिली पतधोरण आढावा बैठक गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या अध्यक्षतेखाली ३ ते ५ एप्रिल या दरम्यान झाली. या बैठकीत रेपो दरामध्ये कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेण्यात आला. याआधी रिझर्व्ह बँकेने फेब्रुवारी २०२३ मध्ये शेवटचे रेपो दर ०.२५ ते ६.५ टक्क्यांपर्यंत वाढवले होते.
अवश्य वाचा : ‘महापरिनिर्वाण चित्रपटातील ‘जय भीम’गाणं प्रदर्शित
रेपो दर म्हणजे काय ? (RBI Repo Rate)
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही सर्व बँकांना कर्ज पुरवठा करते. त्याला रेपो दर म्हटले जाते. रिझर्व्ह बँकेने या दरामध्ये वाढ केली तर बँकांनाही मिळणारे कर्ज महाग होते. त्यामुळे बँका याचा बोजा थेट ग्राहकांवर टाकतात. त्यामुळे गृहकर्ज, वैयक्तिक कर्ज किंवा वाहन कर्जाच्या व्याजदरांमध्ये वाढ होते. याचा फटका ग्राहकांना बसत असतो.