RBI Repo Rate:गृहकर्ज,वाहन कर्ज स्वस्त होणार;रिझर्व्ह बँकेने रेपो रेट घटवला

0
RBI Repo Rate:गृहकर्ज,वाहन कर्ज स्वस्त होणार;रिझर्व्ह बँकेने रेपो रेट घटवला
RBI Repo Rate:गृहकर्ज,वाहन कर्ज स्वस्त होणार;रिझर्व्ह बँकेने रेपो रेट घटवला

RBI Repo Rate : भारतीय रिझर्व्ह बँकेने आज (ता.६) रेपो रेटमध्ये मोठ्या कपातीची घोषणा (Repo rate cut) केली. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी पतधोरण समितीच्या द्वैमासिक बैठकीनंतर ही घोषणा केली. त्यानुसार, रिझर्व्ह बँकेने (RBI) रेपो रेटमध्ये ०.५० टक्क्यांची कपात केली आहे. त्यामुळे आता रेपो रेट (Repo Rate) हा ५.५० टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. याचा फायदा सर्वसामान्य नागरिकांना होऊ शकतो.

नक्की वाचा : ‘त्याच्या बॉडीच पोस्टमार्टम करु नका’;चेंगराचेंगरीत एकुलता एक मुलगा गमावलेल्या पित्याचा टाहो

रेपो रेटमध्ये कपात झाल्यावर बँकांकडून सर्वसाधारणपणे गृहकर्ज आणि वाहन कर्जाचे व्याजदर घटवले जातात. यापूर्वी रिझर्व्ह बँकेने रेपो रेट ०.२५ टक्क्यांनी कमी केला होता. तेव्हा देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक असलेल्या स्टेट बँकेने गृहकर्जाचा व्याजदर कमी केला होता. आता रेपो रेटमध्ये इतक्या मोठ्या कपातीनंतर देश्भरातील खासगी आणि सार्वजनिक बँका कर्जाचे व्याजदर कमी करणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

अवश्य वाचा : ‘मुलीच्या बापाने हुंड्याचे पैसे जावयाला व्यवसायासाठी द्यावेत’; मनोज जरांगेंचं वक्तव्य  

गृहकर्ज आणि वाहन कर्ज घेतलेल्यांना किती फायदा ? (RBI Repo Rate)

गृह कर्ज – ५० लाख
व्याजदर – ८  टक्के
काळ -२० वर्षांसाठी
प्रति महिना बचत – १ हजार ५४२ रुपये

चारचाकी वाहन कर्ज – १० लाख
वाहन कर्ज – ९ टक्के
काळ – ५ वर्षांसाठी
प्रति महिना बचत – २४१ रुपये

आरबीआयकडून सलग तिसऱ्यांदा व्याजदरात कपात (RBI Repo Rate)

रिझर्व्ह बँकेने याआधी सलग दोन वेळा रेपो रेटमध्ये प्रत्येकी ०.२५ टक्क्यांची कपात केली होती. यानंतर आता पुन्हा एकदा रेपो रेटमध्ये ०.५० टक्क्यांची घसघशीत कपात करण्यात आली आहे. यामुळे गृहकर्ज आणि वाहन कर्जाच्या दरात कपात होण्याची दाट शक्यता आहे. आरबीआयनं सीआरआर रेशोमध्ये १ टक्क्यांची कपात केल्याने कॅश रिव्हर्स रेशो ४ टक्क्यांवरून ३ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. आगामी काळात देशातील महागाई दरही ४ टक्क्यांच्या खाली राहण्याची शक्यता आहे.