RBI Repo Rate: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून पतधोरण जाहीर

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी आज रेपो रेटसंदर्भात मोठी घोषणा केली आहे. सहाव्यांदा आरबीआयनं रेपो रेट जैसे थे ठेवण्याचा निर्णय जाहीर केलाय.

0
RBI Repo Rate
RBI Repo Rate

नगर : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तिकांत दास (Shaktikant Das) यांनी आज रेपो रेटसंदर्भात मोठी घोषणा केली आहे. सहाव्यांदा आरबीआयनं रेपो रेट जैसे थे ठेवण्याचा निर्णय जाहीर केलाय. त्यामुळे यावेळीही रेपो रेट ६.५ टक्के इतका स्थिर राहणार आहे. रिझर्व्ह बँकेच्या मॉनेटरी पॉलिसी (Monetary policy) कमिटीनं यासदंर्भातील निर्णय घेतल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. कमिटीतील ६ सदस्यांपैकी ५ सदस्यांनी व्याजदर जैस थे ठेवण्याच्या बाजूने मत दिल्यानंतर हा निर्णय अंतिम करण्यात आलाय.

नक्की वाचा : मुंबई काँग्रेसला धक्का;बाबा सिद्दीकींचा पक्षाला रामराम  

महागाई हा प्राधान्यक्रम (RBI Repo Rate)

महागाई हा प्राधान्यक्रम असल्याची बाब यावेळी शक्तीकांत दास यांनी अधोरेखित केली.“रिझर्व्ह बँकेच्या मॉनेटरी पॉलिसी कमिटीनं कोरोना काळात अर्थव्यवस्थेमध्ये अधिक पैसा खेळता राहावा, यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजना कमी करण्यावर भर देण्यास एकमत दर्शवलं आहे. आर्थिक विकासाला हातभार लावतानाच महागाई नियंत्रणात आणण्यासाठी यामुळे मदत होईल”, असं शक्तीकांत दास पत्रकार परिषदेत म्हणाले.

अवश्य वाचा : आसाराम बापूंची सुटका करा; भिडे गुरुजींच्या शिवप्रतिष्ठानसह, छावा, वारकरी संघटनेची मागणी

पुढच्या आर्थिक वर्षासाठी महागाई दर… (RBI Repo Rate)

यावेळी गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी पुढील आर्थिक वर्षासाठीच्या महागाई दरावरही भाष्य केलं. “पुढच्या आर्थिक वर्षात महागाईचा दर ४.५ टक्क्यावंर राहण्याचा अंदाज आहे. पहिल्या तिमाहीत ५ टक्के, दुसऱ्या तिमाहीत ४ टक्के, तिसऱ्या तिमाहीत ४.६ टक्के तर चौथ्या तिमाहीत  ४.७ टक्के दर राहील”, असा अंदाज शक्तीकांत दास यांनी व्यक्त केला आहे.

हेही पहा : नागवडे पती-पत्नीचा काँग्रेस जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here