नगर : आयपीएलच्या १७ व्या हंगामातील ३० वा सामना बंगळुरुच्या एम चिन्नास्वामी मैदानावर खेळला गेला. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Bangluru) विरुद्ध सनरायझर्स हैदराबादने (Sunrisers Hydrabad) रेकॉर्डब्रेक कामगिरी करताना आरसीबीवर २५ धावांनी विजय मिळवला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना हैदराबाद ने ट्रेव्हिस हेडच्या शतकी खेळीच्या जोरावर विक्रमी २८७ धावा केल्या होत्या. मात्र, प्रत्युत्तरात आरसीबीचा संघ ७ बाद २६२ धावाच करु शकला. आरसीबीकडून दिनेश कार्तिकने सर्वाधिक ८३ धावांचे योगदान दिले.
नक्की वाचा : मराठीत आर्टिफिशियल इंटेलिजन्स वर येणार चित्रपट
हैदराबाद आणि बंगळुरुने केल्या ५४९ धावा (RCB vs SRH)
कर्णधार फाफ डु प्लेसिस आणि दिनेश कार्तिक यांच्या शानदार खेळीनंतरही आरसीबी संघ सनरायझर्स हैदराबादविरुद्ध विजय नोंदवू शकला नाही. प्रथम फलंदाजी करताना हैदराबादने ट्रॅव्हिस हेडचे शतक आणि हेनरिक क्लासेनच्या अर्धशतकाच्या जोरावर २० षटकांत ३ बाद २८७ धावा केल्या. आजवरच्या आयपीएलच्या इतिहासातील ही सर्वात मोठी धावसंख्या ठरली. प्रत्युत्तरात आरसीबीनेही शानदार फलंदाजी केली, परंतु या सामन्यात संघ २५ धावांनी मागे राहिला. आरसीबीला २० षटकात ७ विकेट्सवर केवळ २६२ धावा करता आल्या. दोन्ही संघांमधील या सामन्यात एकूण ५४९ धावा झाल्या. सनरायझर्स हैदराबादकडून कर्णधार पॅट कमिन्सने ४३ धावांत तीन विकेट्स घेतल्या.
अवश्य वाचा : देशात १०६ टक्के पाऊस पडणार;महाराष्ट्रालाही दिलासा
आरसीबीच्या दिनेश कार्तिकने ३५ चेंडूत ५ चौकार आणि ७ षटकार मारत ८३ धावांची खेळी खेळून संघाला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याला यश आले नाही. मात्र या सामन्यात कार्तिकने यंदाच्या हंगामातील १०८ मीटरचा सर्वात लांब षटकार मारला. आरसीबीचा हा सलग पाचवा पराभव असून गुणतालिकेत ते १० व्या स्थानावर कायम आहे. त्याचबरोबर या शानदार विजयासह हैदराबादचा संघ आठ गुणांसह चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. हैदराबादने या मोसमात आतापर्यंत सहापैकी चार सामने जिंकले आहेत, तर दोन सामने गमावले आहेत.
आरसीबीची फलंदाजी कमकुवत (RCB vs SRH)
या सामन्यात आरसीबीच्या पराभवाचे सर्वात मोठे कारण ठरले ते या संघाची खराब गोलंदाजी राहिली. या मोसमात आरसीबीची गोलंदाजी कमकुवत दिसून आली. या सामन्यात सिराजला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर ठेवण्यात आले होते आणि त्याच्या जागी लॉकी फर्ग्युसनला आणण्यात आले होते, मात्र या सामन्यात त्याने ४ षटकात ५२ धावा देत २ विकेट्स घेतल्या. विल जॅकने ३ षटकांत ३२ धावा दिल्या तर रिस टोपलीने ४ षटकांत ६८ धावा दिल्या. या सामन्यात आरसीबीच्या प्रत्येक गोलंदाजाने १३ पेक्षा जास्त इकॉनॉमी रेटने धावा दिल्या. त्यामुळे संघाला पराभवाचा सामना करावा लागला.