नगर : महिला प्रिमियर लीग (Womens Premier League) स्पर्धेत आरसीबीने म्हणजेच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने दिल्लीचा (Delhi Capitals) पराभव करत चषकावर पहिल्यांदाच आपले नाव कोरले आहे. रिचा घोषचा जबरदस्त चौकार आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने जेतेपदावर आपले केले. महिला प्रीमियर लीग २०२४ मध्ये अष्टपैलू खेळी करत आरसीबीच्या संघाने दिल्ली कॅपिटल्स संघाचा ८ विकेट्सने पराभव केला. मागील १६ वर्षांच्या इतिहासात तसेच विराट कोहली कर्णधार असताना आरसीबीला हा चषक उंचावता आला नव्हता. पण आता स्मृती मंधानानं आरसीबीच्या चषकाचा दुष्काळ संपवला आहे.
नक्की वाचा : ‘गुगल मॅप’वर अहमदनगरचे झाले अहिल्यानगर
मॉलिन्यू, श्रेयंका आणि आशा शोभनाच्या भेदक गोलंदाजी (RCB won WPL 2024)
मॉलिन्यू, श्रेयंका आणि आशा शोभनाच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर आरसीबी संघाने पहिल्याच डावात सामना आपल्या बाजूने वळवून घेतला. या पराभवासह दिल्ली कॅपिटल्स सलग दुसऱ्यांदा अंतिम सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे. दिल्ली कॅपिटल्सची फलंदाजी बाजू या सामन्यात पूर्णपणे अपयशी ठरली. त्यांनी आरसीबी संघाला विजयासाठी ११४ धावांचे लक्ष्य दिले होते. मेग लॅनिंग आणि शफालीने संघाला एक शानदार सुरूवात करून दिली. पॉवरप्लेपर्यंत या दोन्ही सलामीवीरांनी ६१ धावा केल्या. त्यांची विस्फोटक फलंदाजी पाहता धावसंख्या मोठा टप्पा गाठेल,असे वाटले होते. मात्र संघाला पूर्ण २० षटकेही फलंदाजी करता आली नाही. सोफी मॉलिन्यूचे दिल्लीच्या डावातील आठवे षटक सामन्याचा टर्निंग पॉईंट ठरला. पुन्हा एकदा एलिस पेरी आणि रिचा घोष या दोन अफलातून फलंदाजांनी सामन्याच्या अखेरपर्यंत मैदानात कायम राहत संघाला विजय मिळवून दिला.
अवश्य वाचा : रशियात पुन्हा पुतिनराज;व्लादिमीर पुतिन पाचव्यांदा अध्यक्षपदी
डिव्हाईन आणि मानधनाची चांगली सुरूवात (RCB won WPL 2024)
११४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना डिव्हाईन आणि मानधनाने संघाला चांगली सुरूवात करून दिली. दोघीही शांत फलंदाजी करत होत्या. पण डिव्हाईन मात्र तिच्या नावाप्रमाणेच एकापेक्षा एक डिव्हाईन शॉट्स मारत होती. शिखा पांडेने डिव्हाईनला बाद करण्यापूर्वी १ षटकार आणि ५ चौकारांच्या मदतीने ३२ धावा केल्या. तर पेरी आणि मानधना संघाचा डाव पुढे नेत असतानाच स्मृती मिन्नू मिनीच्या गोलंदाजीवर झेलबाद झाली.
दिल्ली कॅपिटल्स संघाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यांचा हा निर्णय आरसीबीला फायदेशीर ठरला. कारण संघाच्या दोन्ही सलामीवीरांनी पॉवरप्लेमध्ये एकही विकेट न गमावता ६१ धावा केल्या. शफाली वर्माने २७ चेंडूंत २ चौकार आणि ३ षटकार मारत ४४ धावा केल्या. तिला मेग लॅनिंगने साथ दिली. पॉवरप्लेपर्यंत सामना पूर्णपणे दिल्लीच्या हातात होता पण आठवे षटक दिल्लीसाठी एखाद्या वाईट स्वप्नासारखे ठरले.