Re-Examination:आता मृदा व जलसंधारण विभागातील पदांसाठी देखील होणार फेर परीक्षा

राज्यात नीट परीक्षेत झालेला गैर प्रकाराची घटना ताजी असतानाच राज्य सरकारने (State Government) एक मोठा निर्णय घेतला आहे. मृदा व जलसंधारण विभागातील (Soil and Water Conservation Department) गट-ब संवर्गातील ६५० पदांसाठीची फेर परीक्षा घेतली जाणार आहे

0
Re-Examination:आता मृदा व जलसंधारण विभागातील पदांसाठी देखील होणार फेर परीक्षा
Re-Examination:आता मृदा व जलसंधारण विभागातील पदांसाठी देखील होणार फेर परीक्षा

नगर : राज्यात नीट परीक्षेत झालेला गैर प्रकाराची घटना ताजी असतानाच राज्य सरकारने (State Government) एक मोठा निर्णय घेतला आहे. मृदा व जलसंधारण विभागातील (Soil and Water Conservation Department) गट-ब संवर्गातील ६५० पदांसाठीची फेर परीक्षा घेतली जाणार आहे. जुलै महिन्यात ही परीक्षा होणार असून ही परीक्षा पारदर्शक व्हावी, याकरिता ७ शहरातील १० टिसीएस-आयओएन कंपनीच्या अधिकृत केंद्रावरच ही परीक्षा घेतली जाणार आहे.

नक्की वाचा : मराठा-ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर अधिवेशन काळात सर्वपक्षीय बैठकीतून मार्ग काढू – गिरीश महाजन  

अमरावती शहरातील परीक्षा केंद्रावर गैरप्रकार (Re-Examination)

टीसीएसच्या मुंबई, पुणे, कोल्हापूर, अमरावती, नागपूर, नांदेड आणि छत्रपती संभाजी नगर येथील केंद्रावर १४, १५, १६ जुलै रोजी ही परीक्षा घेतली जाणार आहे. फेब्रुवारी महिन्यात या पदांची भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. मात्र अमरावती शहरातील परीक्षा केंद्रावर गैरप्रकार घडल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे फेरपरीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या घटनेची गंभीर दखल घेत, विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान लक्षात घेऊन सरकारने ही परीक्षा पारदर्शक होण्यासाठी टीसीएस कंपनीच्या परीक्षा केंद्रावर परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडून आल्यास संबधितास जबाबदार ठरवून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना मंत्री संजय राठोड यांनी दिल्या आहेत.

अवश्य वाचा : ‘महाविकास आघाडीच्या एकीसाठी दोन पावलं मागे आलो’- शरद पवार

देशात आणि राज्यात सध्या नीट परीक्षेवरून गोंधळ सुरु आहे. त्यात नेट-यूजी परीक्षा रद्द करण्यात आली आहे. त्यात आता राज्य सरकारने मृदा व जलसंधारण विभागातील गट-ब संवर्गातील पदांसाठी फेरपरीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. या परिक्षेमध्ये देखील गैरप्रकार झाला होता. त्यामुळे यापुढे तरी परिक्षांमध्ये गैरप्रकार होणार नाही अशी आशा विद्यार्थ्यांच्या मनात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here