Reading: अकोले: जीवनातील ध्येय गाठण्यासाठी विद्यार्थ्यांनी वाचनाचा छंद जोपासावा. जीवनात वाचन (Reading) संस्कृती अधिक समृद्ध केली तर आपण निश्चित ध्येयापर्यंत जाऊ शकतो, असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते भानुदास आभाळे यांनी केले. पुण्यातील अक्षरभारती या संस्थेने अकोले तालुक्यातील पिंपळगाव नाकविंदा येथील महालक्ष्मी माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयास ५०० पुस्तकांचे ग्रंथालय (library) शाळेस प्रदान केले. यावेळी ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. व्यासपीठावर अक्षरभारतीचे अयाज सय्यद, गणेश वागस्कर, उपक्रमशील शिक्षक भाऊसाहेब कासार आदी उपस्थित होते.
अवश्य वाचा- लोकांना बेघर करण्याचे काम थांबवावे; पिपाडा यांची फडणवीस यांच्याकडे मागणी
वाचनाने माणूस अधिक प्रगल्भ होतो (Reading)
पुढे बोलताना आभाळे म्हणाले, स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी होण्याचे ग्रामीण विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढत आहे ही आनंदाची गोष्ट आहे. वाचनाने माणूस अधिक प्रगल्भ होतो. अक्षरभारती वाचनालयाचा वापर मुलांनी जास्तीत जास्त करावा. जगापुढे जागतिक तापमान वाढ हे मोठे संकट असून त्यासाठी पर्यावरण जतन व संवर्धनाच्या मोहिमेत सहभागी व्हावे असे आवाहन सय्यद यांनी केले. भाऊसाहेब कासार यांनीही मनोगत व्यक्त केले. स्वागत व प्रास्ताविक मुख्याध्यापक सुनील धुमाळ यांनी केले. सूत्रसंचालन रामदास कासार यांनी केले. यावेळी स्थानिक शालेय समितीचे अध्यक्ष मारुती आभाळे, सूरज काळे, अक्षरभारतीचे श्रीकांत लगड, महेंद्र बोटे आदी उपस्थित होते.



