Navra Maza Navsacha2:’डम डम डम डम डमरू वाजे’ गाण्याचं’नवरा माझा नवसाचा २’मध्ये रिक्रिएशन 

0
Navra Maza Navsacha2
Navra Maza Navsacha2

New Marathi Song : महाराष्ट्राचा लाडका गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. याच गणेशोत्सवाच्या (Ganeshotsav) पार्श्वभूमीवर आपल्या सर्वांना परिचित असलेल गणपती बाप्पाचं “डम डम डम डम डमरू वाजे”(Dum Dum Dum Dum Dumroo Vaje song) हे गाजलेलं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. “नवरा माझा नवसाचा २” या चित्रपटातील हे नव्या ढंगातील गाणे असून, सचिन पिळगावंकर आणि आदर्श शिंदे (Adarsh Shinde) यांनी हे गाणं पहिल्यांदाच एकत्रित गायलं आहे.

नक्की वाचा : आमची सत्ता आली तर लाडकी बहीण योजनेचे पैसे वाढवू’-संजय राऊत

२० सप्टेंबरला चित्रपट होणार प्रदर्शित (Navra Maza Navsacha 2)

सुश्रिया चित्र या निर्मिती संस्थेची निर्मिती असलेल्या “नवरा माझा नवसाचा २” या चित्रपटाची निर्मिती, कथा- पटकथा आणि दिग्दर्शन सचिन पिळगांवकर यांनी केले आहे. तर संवाद संतोष पवार यांचे आहेत. अभिनेते सचिन पिळगांवकर, अभिनेत्री सुप्रिया पिळगांवकर, महाराष्ट्र भूषण अशोक सराफ, स्वप्नील जोशी, हेमल इंगळे, निर्मिती सावंत, वैभव मांगले आणि सिद्धार्थ जाधव असे दमदार कलाकार या चित्रपटाच्या माध्यमातून आपल्या भेटीस येणार आहे. “डम डम डम डम डमरू वाजे” या रिक्रिएट केलेल्या गाण्याचं गीतलेखन प्रवीण दवणे यांनी केले असून संगीत दिग्दर्शन रविराज कोलथरकर या नवोदित संगीत दिग्दर्शकाने केले आहे. “नवरा माझा नवसाचा २” हा चित्रपट २० सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

अवश्य वाचा : अभिनेत्री तेजस्विनी पंडित झळकणार ‘या’ दाक्षिणात्य चित्रपटात

‘गाणं प्रेक्षकांच्या पसंतीस उतरणार’- सचिन पिळगावकर  (Navra Maza Navsacha 2)


यावेळी सचिन पिळगावंकर म्हणाले की, “देवा तुझ्या गाभाऱ्याला” या गाण्यापासूनच मी आदर्श शिंदेच्या आवाजाचा फॅन झालो होतो. मी त्याला माझ्या मुलासारखा मानू लागण्याइतके आम्ही दोघे एकमेकांच्या जवळ येऊ असं मला कधी वाटलं नव्हतं. त्याच्याबरोबर कधी एकत्र गाता येईल हेही माहीत नव्हतं. आदर्शने अत्यंत आपुलकीनं हे गाणं माझ्याबरोबर गायलं आहे. या गाण्यासाठी त्याने खूप मेहनत घेतली आहे, त्याला हवं त्या पद्धतीनं या गाण्यावर त्याने काम केलं आहे. त्यामुळे हे गाणं नक्कीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल. रविराज कोलथरकर या तरुण संगीतकाराचं “नवरा माझा नवसाचा २” या चित्रपटातून पदार्पण होत आहे. अतिशय गुणी असा हा कलाकार आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

गाण्याविषयी आदर्श शिंदे म्हणाला, की “डम डम डम डम डमरू वाजे.” हे गाणं मी लहानपणापासून ऐकत, गात आलो आहे. आता “नवरा माझा नवसाचा२” या चित्रपटात सचिन पिळगावंकर यांच्यासह ते मला गायला मिळणं ही खूप आनंदाची बाब आहे. आम्ही दोघांनी एकाचवेळी एकत्र उभे राहून हे गाणं गाण्याचा वेगळा प्रयोग केला. त्यामुळे पूर्वीच्या काळी जसं रेकॉर्डिंग व्हायचं तसं हे गाणं केलं आहे. तो अनुभव खूप कमाल होता. यंदाच्या गणेशोत्सवात हे गाणे नक्कीच गाजेल, अशी मला आशा असल्याचे गायक आदर्श शिंदे याने सांगितले.  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here