Rain Update:पुढील २४ तास महत्वाचे;हवामान विभागाकडून पावसाचा “रेड अलर्ट” जारी 

मुंबई शहर आणि उपनगरासह पुणे, सातारा, कोल्हापूर ते अगदी कोकण पट्ट्यामध्ये पावसाने हजेरी लावली आहे. उत्तर बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून हा पट्टा अंतर्गत भागांच्या दिशेने सरकताना दिसणार आहे.

0
Rain Update:पुढील २४ तास महत्वाचे;हवामान विभागाकडून पावसाचा “रेड अलर्ट” जारी 
Rain Update:पुढील २४ तास महत्वाचे;हवामान विभागाकडून पावसाचा “रेड अलर्ट” जारी 

नगर : राज्यातील अनेक भागात गेल्या ४८ तासांपासून मध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी (Rain) लावली आहे. हाच मोसमी पाऊस पुन्हा एकदा विदर्भात दाखल झाला आहे. दरम्यान, भारतीय हवामान खात्याने (Indian Meteorological Department) येत्या २४ तासांत विदर्भासह कोकण, पश्चिम किनारपट्टी क्षेत्रात पावसाचारेड अलर्ट”(Red Alert) दिला आहे.

नक्की वाचा :  निवडणूक आयोगाचा शरद पवारांना दिलासा;’पिपाणी’चिन्ह गोठवले

कोकण, पश्चिम किनारपट्टीवर मुसळधार पावसाची शक्यता (Rain Update)

मुंबई शहर आणि उपनगरासह पुणे, सातारा, कोल्हापूर ते अगदी कोकण पट्ट्यामध्ये पावसाने हजेरी लावली आहे. उत्तर बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून हा पट्टा अंतर्गत भागांच्या दिशेने सरकताना दिसणार आहे. त्यामुळे १९ ते २१ जुलै दरम्यानच्या काळात कोकण, पश्चिम किनारपट्टीवर काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. मुंबई शहर आणि उपरनगरांसह राज्याच्या घाटमाथ्यावरील परिसरामध्ये भर दिवसा काळे ढग पाहायला मिळणार आहे, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. सातारा, कोल्हापूरासह कोकण आणि पुण्यातील घाटमाथ्यावर दृश्यमानतेवर याचे परिणाम होताना दिसून येतील.

अवश्य वाचा : जगभरात मायक्रोसॉफ्टचे सर्व्हर डाऊन; बँका, विमानतळाचं काम खोळंबले

विदर्भातील काही जिल्ह्यांना पावसाचा “रेड अलर्ट” (Rain Update)


विदर्भातील काही जिल्ह्यांना हवामान खात्याने पावसाचा “रेड अलर्ट” दिला असून विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. गेल्या ४८ तासांपासून विदर्भात मुसळधार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू आहे. नागपूर जिल्ह्यातील भिवापूर तालुक्यात पुरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. वर्धा जिल्ह्यात देखील पेंढरी व आजूबाजूच्या परिसरात ढगफुटीसदृश्य पाऊस झाला. तर आजदेखील सकाळपासून पावसाला सुरुवात झाली आहे.

नागपूर जिल्ह्यात देखील काल सायंकाळी मध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली. तर आजही पहाटेपासून मध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली. विदर्भातच नाही तर मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह मध्यम स्वरुपातील पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकणात पुढील तीन दिवस अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर, रत्नागिरीला रेड अलर्ट जारी करण्यात आलाय. सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे, पालघरला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here