Red Fort Security:लाल किल्ल्याच्या सुरक्षेत गंभीर चूक,किल्ल्याच्या आत पोहोचला डमी बॉम्ब;सात पोलीस निलंबित

0
Red Fort Security:लाल किल्ल्याच्या सुरक्षेत गंभीर चूक,किल्ल्याच्या आत पोहोचला डमी बॉम्ब;सात पोलीस निलंबित
Red Fort Security:लाल किल्ल्याच्या सुरक्षेत गंभीर चूक,किल्ल्याच्या आत पोहोचला डमी बॉम्ब;सात पोलीस निलंबित

Red Fort Security : १५ ऑगस्टला देशभरात स्वातंत्र्यदिन (Independence Day) मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. देशाची राजधानी दिल्लीत (Delhi) येत्या १५ ऑगस्टच्या अनुषंगाने कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. मात्र स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वीच लाल किल्ल्याच्या सुरक्षेसंदर्भात (Red Fort Security) एक धक्कादायक घटना समोर आली आली आहे. स्वातंत्र्यदिनापूर्वी दिल्ली पोलिसांचा सुरक्षा सरावादरम्यान तपासणीसाठी आणलेला एक ‘डमी बॉम्ब’ (Dummy Bomb) सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या नजरेतून सुटला आणि थेट आत पोहोचला. या गंभीर प्रकारानंतर कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी ७ पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई (7 Policemen Suspended) करण्यात आली आहे.

नक्की वाचा :  मराठा समाजाच्या लग्नासाठी आचारसंहिता लागू;नवीन नियम नेमके काय ?  

लाल किल्ल्यावर सुरक्षा व्यवस्था तपासण्यासाठी मॉक ड्रिल (Red Fort Security)

समोर आलेल्या माहितीनुसार, डीसीपी राजा बांठिया यांनी सुरक्षा सुधारण्याचे आदेश दिले होते. अशातच १५ ऑगस्टपूर्वी लाला किल्ल्यावर सुरक्षा व्यवस्था तपासण्यासाठी एक मॉक ड्रिल घेण्यात आली होती. या अंतर्गत, पोलिसांच्याच एका विशेष पथकाला एक बनावट बॉम्ब (डमी बॉम्ब) घेऊन लाल किल्ल्याच्या परिसरात प्रवेश करण्याचा प्रयत्न करण्यास सांगण्यात आले होते. सुरक्षा यंत्रणा हा बनावट बॉम्ब ओळखू शकते की नाही, हे तपासणे हा यामागील मुख्य उद्देश होता. आश्चर्याची बाब म्हणजे हे विशेष पथक लाल किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वारावरील सुरक्षा तपासणी सहज पार करून डमी बॉम्बसह आत जाण्यात यशस्वी झाले. किल्ल्यावर तैनात असलेल्या कोणत्याही पोलीस कर्मचाऱ्याला किंवा अधिकाऱ्याला हा डमी बॉम्ब ओळखता आला नाही. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली.

अवश्य वाचा :  झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे दिल्लीत निधन

७ पोलीस कर्मचारी निलंबित  (Red Fort Security)

एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, “डमी बॉम्ब घेऊन पथकाने सुरक्षा तपासणी यशस्वीपणे पार केली. कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेवर यामुळे गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या संपूर्ण घटनेला गांभीर्याने घेत दिल्ली पोलिसांनी तातडीने ७ पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. यासोबतच या संपूर्ण प्रकरणाची सखोल अंतर्गत चौकशी सुरू करण्यात आली आहे. लाल किल्ल्यासारख्या महत्त्वाच्या आणि संवेदनशील ऐतिहासिक वास्तूच्या सुरक्षेतील ही त्रुटी अत्यंत गंभीर मानली जात असून, चौकशीनंतर सुरक्षा व्यवस्थेत आणखी कडक पावले उचलली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.