Reel Star : जामीनावर बाहेर आलेली रील स्टार कोमल काळे पुन्हा पोलिसांच्या ताब्यात

Reel Star : जामीनावर बाहेर आलेली रील स्टार कोमल काळे पुन्हा पोलिसांच्या ताब्यात

0
Reel Star : जामीनावर बाहेर आलेली रील स्टार कोमल काळे पुन्हा पोलिसांच्या ताब्यात
Reel Star : जामीनावर बाहेर आलेली रील स्टार कोमल काळे पुन्हा पोलिसांच्या ताब्यात

Reel Star : शेवगाव: पाथर्डी बस स्थानकावर (Pathardi Bus Stand) झालेल्या चोरीच्या संशयावरून ‘रिल स्टार’ (Reel Star) कोमल काळे हिला जिल्हा गुन्हे अन्वेषण शाखेने ताब्यात घेतले होते. तिला सोमवारी जामीन झाला होता. आज परत शेवगाव स्थानिक पोलिसांनी नगर ते शेवगाव दरम्यान एसटी बसमध्ये प्रवास करीत असताना एका प्रवाशाच्या पत्नीच्या पर्समधून सोन्या-चांदीचे दागिने चोरीस जाण्याच्या प्रकरणात कोमल काळे (Komal Kale) हिला चौकशीसाठी ताब्यात घेतले व आज शेवगाव न्यायालयात (Shevgaon Court) हजर केले. न्यायालयाने तिला दोन दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे.

नक्की वाचा : कष्टकऱ्यांचा आवाज हरपला! ज्येष्ठ समाजसेवक डॉ. बाबा आढाव यांचे निधन

जिल्हा गुन्हे अन्वेषण विभागाने घेतले ताब्यात

यापूर्वी कोमल काळे हिला जिल्हा गुन्हे अन्वेषण विभागाने ताब्यात घेतले होते. त्यानंतर तिची न्यायालयात रवानगी करण्यात आली होती. काल सोमवारी (ता.८) शेवगाव न्यायालयाने तिला जामीन मंजूर केला होता. मात्र, आज पुन्हा तिला परत जुन्या चोरीच्या गुन्ह्यात वर्ग करण्यात आले आहे.

अवश्य वाचा: नाशिक-पुणे रेल्वे संगमनेर मार्गेच व्हावी: खासदार भाऊसाहेब वाकचौरे

२ लाख ४० हजारांची झाली हाेती चोरी (Reel Star)

दरम्यान, या चोरी प्रकरणात सुमारे २ लाख ४० हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने एसटी बसमध्ये अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची फिर्याद दिगंबर शिवाजी कणसे यांनी शेवगाव पोलीस ठाण्यात नोंदविली आहे. या प्रकरणाचा सखोल तपास पोलीस करत असून पुढील तपास सुरू आहे.