Reels : सोशल मीडियातून जनजागृतीचा संदेश; अहिल्यानगर पोलिसांचा रील स्पर्धा उपक्रम

Reels : सोशल मीडियातून जनजागृतीचा संदेश; अहिल्यानगर पोलिसांचा रील स्पर्धा उपक्रम

0
Reels : सोशल मीडियातून जनजागृतीचा संदेश; अहिल्यानगर पोलिसांचा रील स्पर्धा उपक्रम
Reels : सोशल मीडियातून जनजागृतीचा संदेश; अहिल्यानगर पोलिसांचा रील स्पर्धा उपक्रम

Reels : नगर : समाजात जनजागृती (Public Awareness) वाढविण्यासाठी आणि नागरिकांना कायदे व नियमांविषयी जागरूक करण्याच्या उद्देशाने अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलाने ‘जागर रील (Reels) महोत्सव २०२६’चे आयोजन केले आहे. सोशल मीडियाच्या (Social Media) माध्यमातून सकारात्मक संदेश पोहोचवण्यावर या उपक्रमाचा भर असणार आहे.

नक्की वाचा : वादात असलेली जमीन खरातनेच विकत घेतली; संगमनेरमध्ये खळबळ

जागर रील महोत्सव २०२६ आयोजित

अहिल्यानगर जिल्हा पोलीस दल व शहर उपविभागाच्या वतीने ७ एप्रिल ते २७ एप्रिल २०२६ या कालावधीत ‘जागर रील महोत्सव २०२६’ (Jagar Reels Festival 2026) आयोजित करण्यात आला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. दिलीप टिपरसे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

प्रभावी संदेश देणारी रील तयार करणे अपेक्षित (Reels)

या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या नागरिकांनी ३० ते ९० सेकंदांची सर्जनशील आणि प्रभावी संदेश देणारी रील तयार करणे अपेक्षित आहे. महिला सुरक्षा व सक्षमीकरण, सायबर क्राईम जनजागृती, वाहतूक नियमांचे पालन, अंमली पदार्थ विरोधी मोहीम, दहशतवाद व नक्षलवाद विरोधी जागरूकता तसेच सोशल मीडियावरील अफवांपासून सावधगिरी अशा विविध विषयांवर रील तयार करता येणार आहेत.


जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी नागरिकांना या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. “आपली सर्जनशीलता दाखवा आणि समाज जागृतीत सहभाग नोंदवा.” असे त्यांनी नमूद केले.


या उपक्रमाचे आयोजन ‘नगर सायकलिंग क्लब’च्या सहकार्याने करण्यात आले असून स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक पारितोषिके देण्यात येणार आहेत.