Regional Transport Department : ऑटोरिक्षा व मीटर टॅक्सीसाठी नोंदणी करावी; प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद सगरे यांचे आवाहन

Regional Transport Department : ऑटोरिक्षा व मीटर टॅक्सीसाठी नोंदणी करावी; प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद सगरे यांचे आवाहन

0

Regional Transport Department : नगर : शासनाने धर्मवीर आनंद दिघे (Dharmveer Anand Dighe) महाराष्ट्र ऑटोरिक्षा व मीटर टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळाची स्थापना केली आहे. या मंडळाच्या विविध योजनांचा लाभ मिळवण्यासाठी ऑटोरिक्षा व मीटर टॅक्सी चालकांनी ऑनलाइन नोंदणी (Online Registration) करावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी (Regional Transport Department) विनोद सगरे यांनी केले आहे.

नक्की वाचा : शेअर मार्केटच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या आरोपीवर हल्ल्याचा प्रयत्न

प्रथम मंडळाचे सभासदत्व घेणे आवश्यक

या कल्याणकारी मंडळामार्फत चालकांसाठी जीवन विमा व अपंगत्व विमा योजना, आरोग्यविषयक सेवा, कर्तव्यावर असताना दुखापत झाल्यास ५० हजार रुपयांपर्यंत आर्थिक सहाय्य, पाल्यांच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना, तसेच कामगार कौशल्य वृद्धी योजना अशा विविध लाभकारी योजना उपलब्ध करून देण्यात येत आहेत. या योजनांचा लाभ घेण्यासाठी पात्र अर्जदारांनी प्रथम मंडळाचे सभासदत्व घेणे आवश्यक आहे.

अवश्य वाचा : आमच्या विरोधात ‘व्होट जिहाद’चा प्रयोग; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा गंभीर आरोप

या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करा सादर (Regional Transport Department)

यासाठी https://ananddighekalyankarimandal.org या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन अर्ज सादर करावा. सभासद नोंदणी करताना वाहनमालकाचे नाव, मोबाईल क्रमांक, जन्मतारीख, वाहनाचा नोंदणी क्रमांक, परवाना क्रमांक, अनुज्ञप्ती क्रमांक, तसेच कुटुंबातील सदस्यांची माहिती, रेशनकार्ड, आधारकार्ड, पॅनकार्ड इत्यादी माहिती भरून आवश्यक कागदपत्रांची प्रत अपलोड करावी, अधिक माहितीसाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.