Registered Police Case | होमगार्डला मारहाण; भिंगारमधील दोघांवर गुन्हा दाखल

0

Registered Police Case | नगर : शासकीय कर्तव्य पार पाडणाऱ्या एका होमगार्डला अडवून त्याला शिवीगाळ करत मारहाण केल्याची धक्कादायक घटना भिंगारमधील पंचशील कमान परिसरात घडली आहे. या प्रकरणी कॅम्प पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल (Registered Police Case) करण्यात आला आहे.

हे वाचा – डॉ. सुजय विखे यांना भाजपाने राज्यसभेवर घ्यावे; मुख्यमंत्र्यांकडे मागणी

फिर्यादी हे होमगार्ड

याबाबत सुनील अशोक घोरपडे (वय ४९, रा. अमेयनगर, भिंगार) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी हे होमगार्ड म्हणून कार्यरत आहेत. गुरुवारी (ता. १२) सकाळी १० वाजेच्या सुमारास ते आपले शासकीय कर्तव्य पार पाडत असताना, आरोपी राजू देवसिंग साळवे आणि त्याच्या मुलाने त्यांना अडवले. 

अवश्य वाचा – भिंगारमधील वाहतूक कोंडीचा प्रश्न संसदेत; उड्डाणपूल उभारणीची खासदार लंके यांची मागणी

शिवीगाळ करत मारहाण

आरोपींनी घोरपडे यांना त्यांच्या कामापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. यावेळी झालेल्या वादातून आरोपींनी घोरपडे यांना शिवीगाळ करत मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. सुनील घोरपडे हे गंभीर जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी अहिल्यानगर येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

हे पहा – ज्योतिषाच्या सल्ल्याने पेटला सूडाचा वणवा;पोटच्या मुलीनेच घेतला आईचा जीव

याप्रकरणी सुनील घोरपडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कॅम्प पोलीस ठाण्यात राजू देवसिंग साळवे याच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक गजेंद्र इंगळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश मुलगीर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गजेंद्र इंगळे करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here