Rekha Gupta:रेखा गुप्ता यांनी घेतली दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ

0
Rekha Gupta:रेखा गुप्ता यांनी घेतली दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ
Rekha Gupta:रेखा गुप्ता यांनी घेतली दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ

नगर : भाजप आमदार रेखा गुप्ता (Rekha gupta) यांनी दिल्लीच्या (Delhi) मुख्यमंत्रीपदी (Delhi Chief Minister) शपथ घेतली. दिल्लीच्या चौथ्या आणि भाजपकडून दिल्लीसाठी पहिल्या मुख्यमंत्री म्हणून त्यांचा शपथविधी पार पडला. दिल्लीतील रामलिला मैदानात पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यासह भाजपचे प्रमुख नेते आणि विविध राज्यांचे मुख्यमंत्री या सोहळ्याला उपस्थिती होते. रेखा गुप्तासह उपमुख्यमंत्री परवेश शर्मा आणि ६ आमदारांनी मंत्रि‍पदाची शपथ घेतली. दिल्लीचे नायब राज्यपाल एलजी विनयकुमार यांनी सर्वच मंत्र्यांना पद व गोपनियतेची शपथ दिली.

नक्की वाचा : कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना दोन वर्षांचा कारावास
दिल्ली विधानसभेत २७ वर्षानंतर सत्ता मिळवण्यात भाजपला यश मिळालं आहे.यापूर्वी,दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी सुषमा स्वराज,शीला दीक्षित,आतिशी यांनी महिला म्हणून कार्यभार सांभाळला होता. आता,रेखा गुप्ता यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली असून शालीमार विधानसभा मतदारसंघातून त्या विजयी झाल्या आहेत. आम आदमी पक्षाच्या तीनवेळा आमदार राहिलेल्या बंदना कुमारी यांचा पराभव करत त्या दिल्लीच्या प्रमुख पदावर विराजमान झाल्या आहेत.

अवश्य वाचा : मोठी बातमी!राज्यातील नऊ लाख बहिणींचे १५०० रुपये होणार बंद 

भाजपकडून दिल्लीसाठी धक्कातंत्र (Rekha Gupta)

दिल्लीतील मुख्यमंत्रीपदाची माळ नेमकं कोणाच्या गळ्यात पडणार याकडे देशाचे लक्ष लागले होते. नेहमीप्रमाणे भाजपने दिल्लीसाठी देखील धक्कातंत्र वापरत रेखा गुप्ता यांना भाजप आमदारांचा गटनेता म्हणून घोषित करण्यात आले. त्यानंतर,आज सकाळी त्यांचा शपथविधी सोहळा पार पडला. संघविचारक आणि प्रचारक राहिलेल्या रेखा गुप्ता यांनी शालेय जीवनापासून भाजपसोबत काम केले आहे. विद्यार्थी संघटनेपासून त्या भाजप व संघ परिवाराशी जोडल्या असून सध्या भाजपच्या महिला राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत. त्यामुळेच,भाजपकडून पहिल्यांदाच आमदार बनलेल्या रेखा गुप्ता यांच्याकडे दिल्लीची जबाबदारी सोपवली आहे.

मुख्यमंत्र्यांसह ६ आमदारांनी घेतली मंत्रिपदाची शपथ (Rekha Gupta)

रेखा गुप्ता यांच्यासह उपमुख्यमंत्री व ५आमदारांनी दिल्लीच्या मंत्रि‍पदाची शपथ घेतली आहे.आशीष सूद, मनजिंदर सिंह सिरसा, रविंद्र सिंह इंद्राज, कपिल मिश्रा आणि पंकज सिंह या आमदारांनी दिल्लीच्या मंत्रि‍पदाची शपथ घेतली. भाजपच्या नव्या मंत्रिमंडळात जाट, पंबजी आणि पूर्वांचल सुमदायाचा विचार करुन स्थान देण्यात आलं आहे. भाजपने जातीय समीकरण सांभाळले असून लवकरच मंत्र्यांचे खातेवाटप होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here