Gunratna Sadavarte : गुणरत्न सदावर्ते यांना दिलासा; सनद निलंबन निर्णयाला स्थगिती

मराठा आरक्षणाला सातत्याने विरोध करणारे डॉ. गुणरत्न सदावर्ते यांना बार काऊंसिल ऑफ इंडियाने मोठा दिलासा दिला आहे. गुणरत्न सदावर्ते यांची सनद दोन वर्षांसाठी निलंबित करण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आली आहे.

0
Gunratna Sadavarte
Gunratna Sadavarte

नगर : मराठा आरक्षणाला सातत्याने विरोध करणारे डॉ. गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांना बार काऊंसिल ऑफ इंडियाने मोठा दिलासा दिला आहे. गुणरत्न सदावर्ते यांची सनद दोन वर्षांसाठी निलंबित करण्याच्या निर्णयाला स्थगिती (Adjournment) देण्यात आली आहे. मार्च २०२३ मध्ये महाराष्ट्र आणि गोवा बार काऊन्सिलने शिस्तभंगाची कारवाई करत सदावर्तेंवर कारवाई केली होती. महाविकास आघाडी सरकारच्या काळात एसटी कर्मचाऱ्यांनी हिंसक आंदोलन केलं होतं. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी सदावर्तेंविरोधात गुन्हा दाखल केला होता.

नक्की वाचा : मोदी सरकारचा मोठा निर्णय; ‘ही’औषधे होणार स्वस्त

काय होत्या तक्रारी ? (Gunratna Sadavarte)

एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनादरम्यान सदावर्ते यांनी माध्यमांसमोर वारंवार केलेली बेजबाबदार विधानं, तसेच त्यावेळी वकिलांसाठीचा पांढरा बँड परिधान करून वकिलांसाठीच्या आचारसंहितेचं उल्लंघन केल्याचा आरोप सदावर्तेंवर आहे. याप्रकरणी पिंपरी न्यायालय वकील संघटनेच्या अध्यक्षांनी सामाजिक कार्यकर्ते नितीन यादव यांनी केलेल्या तक्रारीची दखल घेऊन सदावर्ते यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई केली होती.

अवश्य वाचा : जनसेवा फाउंडेशनतर्फे ‘सांस्कृतिक महोत्सव’चे आयोजन

न्यायमूर्ती गौतम पटेल आणि नीला गोखले यांच्यासमोर सुनावणी (Gunratna Sadavarte)

त्या याचिकेवर न्यायमूर्ती गौतम पटेल आणि न्यायमूर्ती नीला गोखले यांच्यासमोर मार्च २०२३ मध्ये सुनावणी पार पडली. या सुनावणी दरम्यान, समाज माध्यमावर प्रसिद्ध करण्यात आलेला व्हिडिओ न्यायालयाला दाखवण्यात आला. त्यामध्ये सदावर्ते यांची अल्पवयीन मुलगी परवाना नसताना गाडी चालवत असल्याचे दिसून आले. मात्र, अशा तक्रारीची वकील संघटना दखल कशी घेते ? अशी विचारणा न्यायालयाने केली. यावेळी सदावर्ते विरोधात यादव यांची तक्रार फेटाळण्याचे आदेश न्यायालयाने संघटनेला दिले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here