Nawab Malik Bail : नवाब मलिकांना दिलासा ; जामिनाला तीन महिन्यांची मुदतवाढ

Relief to Nawab Malik; Extension of bail by three months

0

नगर : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक (Nawab Malik) यांना सुप्रीम कोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. कारण मलिक यांच्या जामीनाला तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. मनी लाँडरिंग प्रकरणात नवाब मलिक तब्बल दीड वर्ष कारागृहात होते. मात्र वैद्यकीय उपचारासाठी त्यांना ११ ऑगस्ट रोजी जामीन मंजूर झाला होता. या जामीनाला आता सुप्रीम कोर्टाने मुदतवाढ दिली आहे.  

फेब्रुवारी २०२२ मध्ये ईडीने गोवावाला कंपाऊंड प्रकरणात मनी लाँड्रिंग कायद्याखाली नवाब मलिक यांना अटक केली होती. मात्र गेल्या वर्षभरापासून मलिक कोर्टाच्या परवानगीनं कुर्ल्यातील खासगी रूग्णालयात उपचार घेत आहेत. मलिकांनी बऱ्याचदा जामीनासाठी अर्ज केला होता. पण त्यांचा जामीन अर्ज वारंवार फेटाळण्यात आला होता. आज अखेर सर्वोच्च न्यायालयानं मलिकांना मोठा दिलासा देत, वैद्यकीय कारणास्तव जामीन मंजूर केला आहे.

हसीना पारकर, सलीम पटेल, १९९३ मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी सरदार खान आणि नवाब मलिक यांनी गोवावाला कंपाउंडमधील मुनीरा प्लंबर या महिलेची तीन एकर जमीन कट रचून बेकायदेशीरपणे हडपल्याचा आरोप आहे. मलिक यांनी गोवावाला कंपाउंडमधील जागा भाडेतत्वावर देऊन त्यातून आलेल्या पैशांमधून वांद्रे, कुर्ला येथील फ्लॅट्स आणि उस्मानाबादमधील शेतजमीन खरेदी केली असल्याचा ईडीचा आरोप आहे. मात्र नवाब मलिक यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here