Religious Conversions : नगर : अहिल्यानगर शहरातील एका खासगी शिक्षण संस्थेतील मुस्लिम महिला शिक्षिकाकडून विद्यार्थ्यांना धर्मांतराबाबतचे (Religious Conversions) धडे देत असल्याचा प्रकार समोर आला आहे. संबंधित ‘त्या’ महिलेवर कोतवाली पोलीस ठाण्यात (Kotwali Police Station) फिर्याद दाखल झाली असून तत्काळ अटक करून कडक कारवाई करावी, अशी मागणी आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) यांनी पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे (Somnath Gharge) यांच्याकडे केली आहे.
नक्की वाचा : बसमध्ये चोऱ्या करणारी रिलस्टार कोमल आहे खोक्याची भाची
लव जिहादमध्ये अडकवल्याचा आराेप
यावेळी माजी नगरसेवक प्रकाश भागानगरे, सुरेश बनसोडे, दत्ता खैरे, विशाल पवार, डॉ. राहुल मुथा, अनंत शेळके, रमेश गांधी, अमोल देडगावकर, मेहुल शहा, परेश लोढा, दिनेश चोपडा, ओंकार घोलप आदी उपस्थित होते. निवेदनात म्हटले आहे की, शहरातील एका खासगी नामांकित शाळेत ९ वी मध्ये शिकणारी १३ वर्षांची अल्पवयीन मुलीला ‘त्या’ शाळेतील एका मुस्लीम महिला शिक्षिकेने विश्वासात घेवून लव जिहाद या मध्ये अडकवण्याचा प्रकार केला आहे.
अवश्य वाचा : जगातील सर्वाधिक कर्जबाजारी देशात नंबर १ कोण ? वाचा सविस्तर…
कोणा-कोणाचा सहभाग आहे हे तपासण्याची मागणी (Religious Conversions)
या शिक्षिकेने मुलीस एक काम सांगितले नंतर दुस-या दिवशी तिला विश्वासात घेवून तिची घरची माहिती काढली, घरात कोण कोण राहत, घरचा व्यावसाय काय आहे. परिस्थिती कशी आहे. आई वडिलांसोबत मुलीचे संबंध कसे आहेत. याची सखोल माहिती मिळवली. मुलगी एकुलती एक आहे असे समजल्यावर दुस-या दिवशी रॅपर नसलेले चॉकलेट तिला खायला दिले. त्यानंतर मुलीला २३ दिवसानंतर उलट्या झाल्या, गुंगी आली आणि त्याच्या दुस-या दिवशीपासून मुलगी इस्लामची मजहबनी माहिती घ्यायला लागली, मला नमाज पढायला शिकवा, अशी मागणी ती मुलगी त्या शिक्षिकेकडे करायला लागली. यानंतर मुलीला इंस्टाग्रामचा आयडी ओपन करून एका मुस्लीम मुलाशी ओळख करून दिली. व तीचा मोबाईल नंबर त्या मुलाला दिला, तुमचे बहिण भावाचे नाते आहे, असे मुलीला सांगून त्यांच्यात नातेसंबंध बनवून दिले. काही दिवसानंतर त्या मुलामार्फत “हमारे में सब चलता हे” असे बोलून तीच्याशी जवळीक करून संबंध बनवून तीच्याशी रिलेशनशिप मध्ये आला. या मुलाने इतर २५ अल्पवयीन मुलांशी संबंध जुळवून दिले असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे या प्रकारात कोण कोणत्या व्यक्तींचा सहभाग आहे. त्याचा तपास करावा, अशी मागणी पोलीस अधीक्षकांकडे करण्यात आली आहे.



