Republic Day : कर्जत शहर आणि तालुक्यात प्रजासत्ताक दिन उत्साहात

Republic Day : कर्जत शहर आणि तालुक्यात प्रजासत्ताक दिन उत्साहात

0
Republic Day : कर्जत शहर आणि तालुक्यात प्रजासत्ताक दिन उत्साहात
Republic Day : कर्जत शहर आणि तालुक्यात प्रजासत्ताक दिन उत्साहात

Republic Day : कर्जत : कर्जत शहरात आणि तालुक्यात सर्व शासकीय, निमशासकीय यासह महाविद्यालय आणि शाळामध्ये भारतीय प्रजासत्ताक दिन (Republic Day) विविध उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा झाला. कर्जत तहसील कार्यालयात (Karjat Tehsil Office) शासकीय ध्वजवंदन प्रांताधिकारी नितीन पाटील यांच्या हस्ते पार पडले.

Republic Day : कर्जत शहर आणि तालुक्यात प्रजासत्ताक दिन उत्साहात
Republic Day : कर्जत शहर आणि तालुक्यात प्रजासत्ताक दिन उत्साहात

नक्की वाचा : नगरकरांसाठी मोठी बातमी…जिल्ह्यात साडेतीन हजार कोटींचे प्रकल्प उभारले जाणार…

शाळा-महाविद्यालयात देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रम

यावेळी पोलीस उपनिरीक्षक प्रदीप बोऱ्हाडे यांनी त्यांना मानवंदना दिली. याप्रसंगी सर्व शासकीय प्रमुख, राजकीय पदाधिकारी आणि सर्वसामान्य नागरिक उपस्थित होते.यावेळी सकाळी शहरात विविध शाळांच्या विद्यार्थ्यांनी प्रभात फेरी काढत देशभक्तीमय जल्लोष करीत वाहवा मिळवली. भारत माता की जय, वंदे मातरमच्या जय घोषणेने परिसर दणाणून सोडला होता. सर्व शासकीय कार्यालयात विभाग प्रमुख, मुख्याध्यापक यासह आजी-माजी भारतीय जवान आणि मान्यवरांच्या हस्ते तिरंगा ध्वज फडकविण्यात आला. अनेक शाळा-महाविद्यालयात देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले.

Republic Day : कर्जत शहर आणि तालुक्यात प्रजासत्ताक दिन उत्साहात
Republic Day : कर्जत शहर आणि तालुक्यात प्रजासत्ताक दिन उत्साहात

अवश्य वाचा : ‘मराठ्यांना हाल हाल करुन मारणं ही मुख्यमंत्र्यांची जबाबदारी नाही’- मनोज जरांगे

राजकीय पदाधिकारी व नागरिक उपस्थित (Republic Day)

तर शहरातील हुतात्मा स्मारकास प्रांताधिकारी नितीन पाटील, पोलीस उपअधीक्षक विवेकानंद वाखारे, तहसीलदार गुरू बिराजदार, पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव, होमगार्ड विभागाचे मुन्ना पठाण आदींनी अभिवादन केले. सकाळी ९:१५ वाजता कर्जत तहसील कार्यालयात शासकीय ध्वजारोहन प्रांताधिकारी पाटील यांच्या हस्ते पार पडला. यावेळी पोलीस उपनिरीक्षक प्रदीप बोऱ्हाडे यांनी त्यांना पोलीस दलाच्यावतीने मानवंदना दिली. यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी राजेंद्र सुपेकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता प्रशांत वाघचौरे, प्रभारी तालुका कृषी अधिकारी शीतल पाचारणे, निवासी नायब तहसीलदार विजय कारंडे, प्रीतम ठोंबरे, योगेश्वर जाधव, पोलीस उपनिरीक्षक रमीज मुलाणी, मुख्याधिकारी अक्षय जायभाये यांच्यासह आजी-माजी सैनिक, सर्व राजकीय पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते.