
नगर: प्रजासत्ताक दिनाच्या (Republic Day) निमित्त यंदा नवी दिल्लीतील कर्तव्यपथावर झालेल्या संचलनात महाराष्ट्राच्या चित्ररथाने प्रथम क्रमांक पटकाविला (Maharashtra’s tableau won first place) आहे. महाराष्ट्राच्या चित्ररथाची यंदाची संकल्पना ही गणेशोत्सवाची (Ganeshotsav) होती. विविध निकषांवर मूल्यांकन करत महाराष्ट्राला पहिला क्रमांक जाहीर करण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या वतीने संरक्षण मंत्रालयाने ही घोषणा केली. यामध्ये द्वितीय क्रमांकावर जम्मू काश्मीर आणि तृतीय क्रमांकावर केरळ राज्याचा चित्ररथ राहिला.
नक्की वाचा: आता राष्ट्रवादीचा दादा कोण?राष्ट्रवादीचं नेतृत्व कोण करणार?
आत्मनिर्भर भारत संकल्पनेवर आधारित चित्ररथ (Republic Day Maharashtra Tableau)

प्रजासत्ताक दिनी कर्तव्य पथावर महाराष्ट्र राज्याकडून गणेशोत्सवाची संकल्पना मांडण्यात आली होती. तुषार प्रधान, रोशन इंगोले, कृष्णा सालवटकर, श्रीपाद भोंगाडे यांनी महाराष्ट्राच्या चित्ररथाला सुंदर आकार दिला होता. आत्मनिर्भर भारत या संकल्पनेवर महाराष्ट्राच्या चित्ररथावर सजावट करण्यात आली होती. यामध्ये महाराष्ट्रातील गणेशोत्सवाचे दर्शन घडलं. महाराष्ट्राच्या चित्ररथावर अष्टविनायकांच्या प्रतिकृती, ढोलताशे आणि गणपती बाप्पाची मूर्ती अशी सजावट होती. गणेशोत्सव आज असंख्य लोकांना आत्मनिर्भर बनवत आहे. यावरूनच गणेशोत्सव-आत्मनिर्भरतेचे प्रतिक ही संकल्पना चित्ररथातून सादर केली गेली.
अवश्य वाचा: अजित पवार यांचं ६ क्रमांकाशी नेमकं कनेक्शन’ काय? जाणून घ्या…
गणेशोत्सव हा महाराष्ट्रातील प्रमुख क्षण आहे. या काळात महाराष्ट्रात ६० ते ७० लाख कोटींची उलाढाल होते. आत्मनिर्भर भारत या मोहिमेला गणेशोत्सवाच्या माध्यमातून कशी चालना मिळते, हा संदेश चित्ररथाच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मूर्तीकार, सजावट करणाऱ्यांना मिळणारा रोजगार तसेच त्यातून तयार होणारी आर्थिक साखळी हा चित्ररथाचा मुख्य विषय होता.
देशभरातून ३० चित्ररथांचा समावेश (Republic Day Maharashtra Tableau)
या वर्षीच्या परेडमध्ये एकूण ३० चित्ररथांनी भाग घेतला. १७ राज्ये आणि १३ केंद्र सरकारच्या विभागातील चित्ररथाचा यामध्ये समावेश होता. स्वातंत्र्याचा मंत्र वंदे मातरम आणि समृद्धीचा मंत्र आत्मनिर्भर भारत ही यंदाची थीम होती. प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात कोणत्या राज्याचा चित्ररथ सहभागी होणार यासाठी एक समिती निर्णय घेते. यामध्ये कलाकार, विविध क्षेत्रातील तज्ज्ञ, पद्म पुरस्कार विजेते सामील असतात. प्रत्येक वर्षी आलटून पालटून राज्यांच्या चित्ररथांना परेडमध्ये समाविष्ट केले जाते.


