Reservation : नगर : मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) प्रश्नावर ताेडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखाली सरकारने एक माेठा निर्णय घेण्याच्या तयारी सुरू केली आहे. त्यानुसार बिहार राज्याच्या धर्तीवर महाराष्ट्रातही आरक्षणाची (Reservation) मर्यादा वाढवण्यात येणार असल्याची चर्चा आहे. यासंबंधी नागपूर येथे हाेणाऱ्या राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात (Winter session) सरकार आरक्षणाची मर्यादा वाढवण्यासाठी विशेष चर्चा आणि त्यानंतर ऐतिहासिक निर्णय घेण्याच्या विचारात आहे.
नक्की वाचा: वर्षश्राद्ध आंदोलन तात्पुरते स्थगित
मराठा आरक्षणाच्या मुद्दा राज्यभर गाजत आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्राचं राजकीय वातावरण तापलेलं आहे. आरक्षणासाठी लढा पुकारणारे मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाचा ओबीसी प्रवर्गात समावेश करावा, अशी मागणी लावून धरली आहे. तर ओबीसी नेते छगन भुजबळांनी याला जोरदार विरोध केला आहे. ओबीसी आरक्षणाला धक्का लागता कामा नये, अशी ओबीसी नेत्यांची प्रमुख मागणी आहे. यावर तोडगा काढण्यासाठी आता राज्य सरकार मोठ्या तयारीत असल्याची सूत्रांची माहिती आहे.
हे देखील वाचा: ..ती राजकीय चूक झाली, नाहीतर राज्यात भाजपची सत्ता आली नसती; माजी मुख्यमंत्र्यांची कबुली