Reservation : आरक्षणाचा तिढा, उपाय काय?; पाेपटराव पवारांनी सांगितला ताेडगा

Reservation : आरक्षणाचा तिढा, उपाय काय?; पाेपटराव पवारांनी सांगितला ताेडगा

0
Reservation : आरक्षणाचा तिढा, उपाय काय?; पाेपटराव पवारांनी सांगितला ताेडगा
Reservation : आरक्षणाचा तिढा, उपाय काय?; पाेपटराव पवारांनी सांगितला ताेडगा

Reservation : नगर : सध्या महाराष्ट्रात (Maharashtra) विविध समाजातील आरक्षणाबाबत संघर्ष चालू आहे. आरक्षणाबाबत (Reservation) सत्ताधारी व विरोधक एकत्र येत सर्वसमावेशक निर्णय घेण्याची गरज आहे. कारण सध्याची विविध समाजामधील तणावाची परिस्थिती आर्थिक गरजेपोटी उद्भवली आहे. निर्णय घेण्यास उशीर झाल्यास विविध समाजांमध्ये वैचारिक व भावनिक विरोध निर्माण होण्याची शक्यता नाकारता येणार नाही, असे राज्याच्या आदर्शगाव संकल्प व प्रकल्प समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार (Poptrao Pawar) यांनी ‘आय लव्ह नगर’शी बाेलताना सांगितले.

हे देखील वाचा : महिलांच्या सुरक्षित प्रवासासाठी ‘पिंक रिक्षा योजना’

पाेपटराव पवार म्हणाले, ”आरक्षण प्रत्येकाला शिक्षणात का गरजेचं वाटते. त्याला कारण सतत पडणारा दुष्काळ आहे. शेतकरी अल्पभूधारक हाेत चाललेला आहे. शिक्षणाचा खर्च जेव्हा क्षमतेपेक्षा जास्त हाेताे. त्यावेळी त्यावर्गाला वाटते की मला आरक्षण मिळाले पाहिजे. सद्या ज्या वर्गाला आरक्षण आहे. त्यांना नाेकरीच्या किती संधी आहे, याचे आत्मचिंतन महत्त्वाचे आहे. आरक्षणासंदर्भात खरे म्हणजे खरा गरीब काेण हे शाेधणे गरजेचे आहे. मग ताे कुठल्याही समाजाचा असाे, यासाठी सर्व पक्षाने एकत्र येण्याची गरज आहे. समाजातले जे घटक ज्यांना नाेकरीची, शिक्षणाची संधी नाही. ते शाेधण्याचे काम केले पाहिजे. निव्वळ मतपेटीचं गणित डाेळ्यासमाेर न ठेवता, गरिबांसाठी अभ्यासगट तयार करणे गरजेचे आहे. यासाठी सर्व पक्षाने मंथन करून गरजूंना न्याय दिला पाहिजे. भारत हा कृषी प्रधान देश आहे. शेतीवर अवलंबून असणाऱ्यांच्या गरजा काय आहे. त्यासाठी काय उपाययाेजना महत्त्वाच्या आहे. हे पाहणे गरजेचे आहे. अन्यथा हा प्रश्न असाच भिजत राहिला, तर भविष्यात कायदा, सुव्यवस्थेचा माेठा प्रश्न निर्माण हाेऊ शकताे.

हे देखील वाचा : भाजप हटाव…देश बचाव; ‘आयटक’ची राज्यव्यापी महासंघर्ष यात्रा उद्या नगरमध्ये

सध्या राज्यात पावसानं दडी मारल्याचं चित्र आहे. याचा भारतीय शेतीवर दूरगामी परिणाम हाेणार आहे. पीक व पाणी व्यवस्थापनाची गरज आहे. उपलब्ध असलेले पाणी सदविवेक बुद्धीने वापरण्याची गरज आहे. निसर्गाचं केलेलं शाेषण याचं पुनर्भरण करू शकलाे नाही. तर पिण्याच्या पाण्याचं सर्वात माेठं संकट महाराष्ट्रात नाही, तर देशात निर्माण हाेऊ शकते.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here