Reservation:’मराठा,धनगर आरक्षणासाठी उदयनराजेंनी घेतली मोदींची भेट

मराठा आणि धनगर समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी खासदार उदयनराजे भोसले आणि भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

0
'मराठा,धनगर आरक्षणासाठी उदयनराजेंनी घेतली मोदींची भेट

नगर : मराठा आणि धनगर समाजाला आरक्षण (Maratha Dhangar Reservation) मिळावे, या मागणीसाठी खासदार उदयनराजे भोसले (MP Udayanraje Bhosle)आणि माढ्याचे भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर (MP Ranjitsinh Naik-Nimbalkar) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांची आज दिल्लीत भेट घेतली. या भेटीदरम्यान पंतप्रधान मोदी यांनी दोन्ही समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सोडविण्यासंदर्भात सकारात्मकता दर्शवल्याची माहिती समोर आली आहे.

नक्की वाचा :  शनिशिंगणापूर देवस्थानमधील भ्रष्टाचाराची चौकशी होणार ; शिंदे फडणवीस सरकारची घोषणा 

सोमवारी(ता. १९) दिल्लीमध्ये सर्वपक्षीय खासदारांची बैठक झाली. त्याच पार्श्वभूमीवर खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी मराठा व धनगर समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेटीची वेळ मागितली होती. या भेटीदरम्यान खासदार छत्रपती उदयनराजे व खासदार नाईक-निंबाळकर यांनी महाराष्ट्रातील मराठा आणि धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागणीवर त्यांच्याशी चर्चा केली.

अवश्य वाचा : डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेच्‍या राष्‍ट्राध्‍यक्षपदासाठी अपात्र

ओबीसी आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, ही भूमिका त्यांनी स्पष्ट केली. तसेच महाराष्ट्रातील धनगर समाजाला अनुसूचित जातीमध्ये आरक्षण मिळाले पाहिजे, यासाठी हा समाज अनेक वर्ष झटत आहे. इतर राज्यामध्ये धनगर समाजाला आरक्षण मिळाले आहे. परंतु महाराष्ट्रात खेळ झाला आहे. महाराष्ट्रात धनगड शब्द नसल्याने आरक्षण मिळत नाही, तरी याबाबत लक्ष घालावे, अशी विनंती त्यांनी पंतप्रधानांकडे  केली. या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या मागणीचा सकारात्मक विचार केला जाईल व लवकरच तोडगा काढला जाईल, असे आश्वासन दिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here